HW News Marathi
क्राइम

उंडेगावमधील चोरी प्रकरणी वडील फिर्यादी तर मुलगाच निघाला आरोपी

उस्मानाबाद | उस्मानाबादमधील परंडा तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांच्या घरफोडी प्रकरणी आरोपी त्यांचाच मुलगा निघाला असून आंबी पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. यावेळी दोन आरोपींना अटक करून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी दिली आहे.

परंडा तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी करून अज्ञात चोराने रोख रक्कम चोरली होती. या प्रकरणी आंबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील चोरीचा तपास पोलीसांनी सुरू केला होता. याप्रकरणी सुनील अरविंद शेरे व प्रवीण भक्तीदास शेरे या दोघांनी गाव परिसरात यापूर्वी अनेक वेळा चोरी केल्याने त्यांना आंबी पोलिसांनी अटक केली होती. संबंधित दोन्ही आरोपींची दुसऱ्या गुन्ह्यात उस्मानाबादच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्या गुन्ह्यातील तपासाला आंबी पोलिसांनी सुरुवात केली होती असून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भुम यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पो. ना. एस. पी शिंदे. पो. कॉ. सतीश राऊत, पो. कॉ. सोनटक्के यांच्या पथकाने तपास केला असता उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरफोडी त्यांचा मुलगा सुनील शेरे याने प्रविण शेरे याच्या मदतीने घरफोडी करुन चोरी केल्याची खात्री पटली. त्यानंतर आंबी पोलिसांनी दोन्ही आरोपींना उस्मानाबादच्या कारागृहातुन ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले, तर या घटनेचा पुढील तपास पो. ना. शिंदे हे करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंब्रातून आणखी १ संशयित एटीएसच्या ताब्यात

News Desk

दाभोलकर – पानसरे हत्या पूर्वनियोजितच – उच्च न्यायालय

News Desk

तीन बहिणींचा विनयभंग करणा-या ग्रामसेवकासह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

News Desk