HW News Marathi
क्राइम

लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोराला रंगेहात पकडले

मुंबई हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 8 वरून प्रवास करतेवेळी मंगीपल्ली अजया तिरुमलेश या प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या चोराला रंगेहात पकडण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. सैदुल शेख (वय 22) राहणार मानखुर्द असे या चोरट्याचे नाव असून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आणखीन एका गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरु असल्याचे लोहमार्ग वडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी सांगितले.
रेल्वे ने प्रवास करतेवेळी अनेक प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार घडत असतात. यावर नियंत्रण यावे यासाठी जीआरपी व आरपीएफ पोलीस उपायोजना राबवित असले तरी मोबाईल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे चित्र असून हार्बर मार्गावरील कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून प्रवास करणाऱ्या मंगीपल्ली अजया तिरुमलेश या प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या सैदुल शेख (वय 22) या चोराला रंगे हात पकडण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वी गुरु तेग बहादूर नगर रेल्वे स्थानकातून एका विद्यार्थिनीच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून पळ काढल्याचे कबुल केले आहे. शेख कडून 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 4 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे. तर ता. 30 मे 2017 रोजी करिष्मा केशव रेवाळे या विद्यार्थिनीने सोन साखळी चोरीला गेल्याची तक्रार वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्यानुसार करिष्माला शहानिशा करून तिची सोनसाखळी सुपूर्त करण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्यांनी तोडले महिलेच्या मृतदेहाचे लचके

News Desk

जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

मंत्री नवाब मलिक यांचा कारवाईचा आरोप एनसीबीने फेटाळला

News Desk