HW News Marathi
क्राइम

मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवाला अटक

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वादग्रस्त उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयात नोकरी लावून देतो, असे सांगून मंझा यांनी तरुणांला सहा लाखांचा गंडा घातला होता. त्यामुळे मंझा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

देवराव चव्हाण (रा.चिकलठाणा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. महाविद्यालयात कारकूनपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ईश्वरसिंग मंझा यांनी सहा लाख रुपये घेतले होते. परंतु नोकरी लागली नाही. परिणामी चव्हाण पैसे परत मागितले असता मंझा यांनी दोन धनादेश दिले. मात्र ते वटले नाहीत. नंतर चव्हाण यांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मंझा यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांनी विद्यापीठाची फसवणूक केल्याचेही समोर आले होते. मंझा यांनी 2006 मध्ये एम.एस्सी. भौतिकशास्त्र परीक्षेत उत्तरपत्रिकेत खाडाखोड केली आणि स्वत:चे गुण वाढवून घेण्याचा प्रताप केला. त्यांनी शून्याचे 24 मार्क करून घेतले. प्रत्यक्षात उत्तरपत्रिकेत त्यांना शून्य गुण मिळाले होते. चार प्रश्नांना आठ गुण दिल्याचे दाखविण्यात आले आहे. पदव्युत्तर पदवी मिळताच ईश्वरसिंग मंझा यांची उपकुलसचिवपदी नियुक्ती झाली. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे यांनी कुलगुरुंकडे केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बायकोच्या लफडेबाजाली कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंहची तब्येत बिघडली, उद्या न्यायालयात हजर राहणार ?

News Desk

अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

News Desk
क्राइम

पीएनबी बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे ‘मी कर्ज फेडू शकत नाही’ – नीरव मोदी

swarit

मुंबई – पंजाब नॅशनल बँक घोटळा प्रकरणात पहिल्यांदा नीरव मोदीने मौन सोडले आहे. पीएनबी बँकेला पत्र लिहून ‘बँकेने हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी कर्ज फेडू शकत नाही’असे या पत्रात म्हटले आहे. पीएनबीचे ५ हजार कोटीपेक्षा कमी कर्ज असल्याचा दावा ही मोदींने पत्रात केला आहे.

“पत्नी आणि मामा मेहुल चोक्सी या दोघांचाही या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मामाचा व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,” असे ही नीरव मोदीने म्हटले आहे.

नीरव मोदीने पीएनबी बँकेला तब्बल ११,५०० कोटीचा चुना लावल्याने ईडीने मोदींच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आली आहे. या छप्यात मोदींच्या गितांजली जेम्स या शोरूममधून ५१०० कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने हस्तगत केले. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील जप्त केल्या आहेत.

 

Related posts

जळगावात पोलीस आपसात भिडले

News Desk

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

स्व:ताच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

News Desk