मुंबई | नालासोपारा येथे एका शाळकरी मुलाने इमारतीच्या आवारातील पुलअप्स बारला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुजेफा अजगरली नागोरी (१३ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या मुलाच्या वहीत रेखाटलेल्या चित्रांमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात या मुलाच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुजेफा हा नालासोपारा पूर्व येथील रश्मी रेसिडेन्सी नावाच्या इमारतीत राहत होता. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास इमारतीच्या आवारात असलेल्या पुलप्सबारला गळफास घेतलेल्या अवस्थेत हुजेफाचा मृतदेह आढळला. हुजेफाचे दप्तर तपासल्यानंतर त्याच्या वहीत काही चित्रे पोलिसांना आढळली. या वहीत हुजेफाने पंख्याला लटकलेल्या एका मुलाचे चित्र काढले होते. या चित्रासह ‘९.३० वाजता’ आणि ‘ए विंग’ असे देखील लिहिले होते. दरम्यान, याबाबत तपास सुरु असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.