HW News Marathi
क्राइम

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जमीन अर्ज सत्र न्यायालयाने  फेटाळला आहे.  सध्या तरी मलिकांवर कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार असल्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात होणार नाही, अशी माहिती माध्यमांतून मिळाली आहे. न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला असल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिकांच्या प्रकरणावर न्यायालयात आज (30 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने अटक केले आहे.  या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने म्हटले, “ईडीने जे पुरावे गोळा केले होते. यानुसार, मलिकांच्या आर्थिक गैरव्यवहार घोटाळ्याच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. या परिस्थिती मलिकांना न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.”

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळकरी मुलींच्या ऑटोला अपघात, नऊ वर्षीची बालिका दगावली

News Desk

#PulwamaAttack : आता आतंकवादविरोधी लढाई आणखी तीव्र होणार !

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk