उत्तम बाबळे
नांदेड :- जिल्ह्यातील माै.पिंपळढव ता.भोकर येथील एका शेतातील झाडाखाली आश्रयासाठी काही शेतकरी थांबले असतांना मेघगर्जनेसह झालेल्या पावसात झाडावर विज पडली याच झाडाखाली थांबलेल्या २ पुरुष व २ महिला असे चार जण जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणूनच हे बचावले आहेत.तर त्यांच्यावर भोकर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माै.पिंपळढव येथील शेतकरी संभाजी दत्तराम पुणेबोईनवाड यांच्या शेतात खरीप पेरणी सुरु असतांना १७ जून २०१७ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोराचा पाऊस सुरु झाला.यावेळी शेतात पेरणी काम करत असलेले सर्व शेतकरी व शेतमजूर धावत जाऊन एका झाडाखाली आश्रयासाठी थांबले असतांना अचानकपणे विजेचा कडकडाड झाला व विज त्या झाडावर पडली.यावेळी झाडाखाली थांबलेल्या संभाजी दत्तराम पुणेबोईनवाड (५०),त्यांची पत्नी चंद्रकलाबाई संभाजी पुणेबोईनवाड (४०),भारतबाई साईनाथ कोंडलवार (३५),माधव विठ्ठल गनलावाड (४५) सर्वजण रा.पिंपळढव जखमी झाले आहेत.त्यांना उपचारार्थ भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तहसिल कार्यालयाचे मंडळ अधिकारी महेश वाकडे व पिंपळढव सज्जाचे तलाठी बी.एच.ठाकूर यांनी रुग्णालय आणि घटनास्थळी भेट दिली असून त्यांच्यासह भोकर पोलीसांनी देखील या घटनेचा पंचनामा केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.