HW News Marathi
क्राइम

नातीवर बलात्कार करून लंडनला पळणाऱ्या नराधमाला एअरपोर्टवरून अटक

गुरूग्राम येथे आपल्या स्व:ताच्या नातीवर बलात्कार करून फरार होत असलेल्या 64 वर्षीय नराधामाला पोलिसांनी मुंबई एअपोर्ट येथून अटक केली आहे. आरोपी आणि त्याची पत्नी दोघेही लंडनला पळून जात होते. मुंबई एअरपोर्ट येथे दोघांनाही गुरगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या पत्नीने पिडित मुलीला मारहान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आरोपी मुंबई एअरपोर्टवरून लंडनला पळून जाणार असल्याची माहिती गुरगाव पोलिसांना मिळताच त्यांच्या तीन जणांच्या पथकाने त्या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना गुरूवारी गुरगावमध्ये नेऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंबई एअरपोर्टवर आरोपी विमानाची वाट पाहत असताना आमच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. बलात्कार प्रकरणी आपल्याला अटक होणार याची त्यांना माहिती असल्याने त्या दोघांना शहर सोडून जायचं होतं. आधी महिला पोलीस स्टेशनची टीम त्यांच्या जमशेदपूरमधील घरी गेली असता घराला कुलूप असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी पोलीस पथकाने आम्हाला तात्काळ त्याची माहिती देऊन सावध केलं. महिला पोलीस टीमच्या माहितीनंतर आम्ही या जोडप्यासाठीची शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती ही संपूर्ण कारवाई करणारे पोलिस अधिकारी कैलाश यांनी दिली आहे. हिंदूस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारातून झालेल्या अपत्याला दत्तक देण्यास भाग पाडले

News Desk

अनधिकृत धार्मिक स्थळे बांधकाम संबंधी तक्रार व हरकती  निवारणासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु    

News Desk

शहांवर टीका केल्यासंदर्भात चव्हाणांवर कंबोजांनी पोलिसात केला गुन्हा दाखल

Aprna