HW News Marathi
क्राइम

अंशी वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

पुणे: पिंपरी-चिंचवड येथील रुपीनगर परिसरातील झोपडपट्टीत राहणा-या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला घरात एकटी होती याचा फायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले. पीडित महिला तिच्या ४९ वर्षीय मुलासह रुपीनगरमध्ये राहते. १३ जानेवारीला मुलगा घराबाहेर गेले असताना आरोपीने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला व बळजबरीने बलात्कार केला. मुलगा घरी परतल्यानंतर तिने सर्व घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी लगेच देहूरोड पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. या महिलेच्या वैद्यकीय तपासणीमधून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तपास करायला गेले अन पोलिसांनी केले 9 कोटी हडप

News Desk

तीन दिवसांपूर्वी जॉइन झालेल्या हैदराबादच्या आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या

News Desk

जळगावात ट्रकवर दगडफेक

News Desk
देश / विदेश

विमानात मिळणार इंटरनेट, वायफाय

swarit

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय हवाई हद्दीत विमानाचे उड्डाण सुरू असताना माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी संपर्क सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केली आहे. माहितीचे महाजाल अथवा भ्रमणध्वनी संपर्क सेवा किंवा दोन्ही सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या किंवा नाही हा निर्णय एअरलाइन्सचा असेल. तथापि, तांत्रिकदृष्ट्या या सेवा उपलब्ध करून देता येणे शक्य असल्याने आणि सुरक्षेच्या मुद्यावर तोडगा निघू शकत असेल तर या दोन्ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाची कोणतीही आडकाठी असण्याची गरजच नाही. त्यामुळे माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी सेवा भारतीय हद्दीत उपलब्ध करून द्याव्या, असे ट्रायने म्हटले आहे.

Related posts

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

मोदींचे आरोप म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे! – नाना पटोले

Aprna

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष, जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

News Desk