मुंबई | ‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूने वार करून हत्या केली आहे. गुरुजींच्या हत्येने कर्नाटकात खळबळ माजली. चंद्रशेखर गुरुजी यांची आज (5 जुलै) दुपारी 12 वाजता हुबळीतील लॉबीत हॉटेलमध्ये दोन अज्ञात व्यक्तीनी धारदार चाकूने हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, चंद्रशेखर गुरुजींची हत्या धक्कादायक हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुरुजींच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी हुबळी पोलिसांनी सर्व परिसरात नाकेबंदी केली आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन मारेकरी चंद्रशेखर गुरुजींचे अनुयायी म्हणून हॉटेलमध्ये आले होते. गुरुजींच्या पाया पडले आणि त्यानंतर मारेकऱ्यांनी गुरुजींवर धारदार चाकूने वार केला. यानंतर दोघेही आरोपींनी तेथून पळ काढला.
Karnataka | Saral Vastu exponent Chandrashekhar Angadi alias Chandrashekhar Guruji was stabbed by two unidentified people at The President Hotel in Hubballi. His body has been shifted to KIMS hospital.
Visuals from the hotel as well as the hospital. pic.twitter.com/BODDIPMUWh
— ANI (@ANI) July 5, 2022
गेल्या काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या विरोधात त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा थकीत पगारासाठी आंदोलन केले होते. यामुळे गुरुजींच्या हत्येमागे त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असेल. गुरुजी हे त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे हुबळीला आले होते. यावेळी गुरुजींनी अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केली
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.