HW News Marathi
राजकारण

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

मुंबई | “शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार आहे,” अशा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आज (5 जुलै) शिवसेना भवनात महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर घाणाघाती हल्ला केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांच्यावर विश्वास ठेऊ नका, असे सांगितले, तेच अजूनही आमच्यासोबत आहेत. ज्या लोकांवर मी विश्वास ठेऊन मी निवांत होतो. त्या लोकांनी माझा विश्वासघात केला. मी सगळ्यातून मार्ग काढणार आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार आहे.”

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे हे बैठकांवर बैठका घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज पार पडलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या समोरचा माईक हिंसकावून घेतला. आज माईक हिसकावला, उद्या काय हिसकावतील हे काही तुम्हाला समजणार नाही.” उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर देत ते म्हणाले, “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! #MaharashtraFirst”.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरची स्वाभिमानी जनता कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करेल

News Desk

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna

मिझोरममध्ये ७५ टक्के मतदान

News Desk