HW News Marathi
क्राइम

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

मुंबईः कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. एका भक्ताने हा सोन्याचा मुलामा असलेला कळस दिला होता. सुमारे एक लाख २५ हजार रूपये किंमतीचा हा कळस होता. पहाटे कळस चोरील गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून सीसीटीव्हीफुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं.

या घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानीक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. दरम्यान, मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

30 दिवसात ५ कोटीचा मुद्देमाल जप्त

News Desk

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातन संस्थाच…

News Desk

अल्पवयीव विद्यार्थिंनीचा पाठलाग करून विनयभंग

News Desk