HW News Marathi
क्राइम

बलात्कारातून झालेल्या अपत्याला दत्तक देण्यास भाग पाडले

ठाणे : युवतीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारातून जन्मलेल्या मुलीला जबरदस्तीने दत्तक द्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक झालेली नाही.

पीडित २३ वर्षीय युवती आणि आरोपी रोशन जयसिंग पवार (२६) राबोडीत एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. सन २०१५मध्ये गणपतीमध्ये आरोपीने माजिवडा गावातील त्याच्या घरी युवतीला बोलावले होते. या वेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. परिणामी, पीडित युवती गर्भवती राहिली आण‌ि तिने मुलीला जन्म दिला. मात्र आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध या मुलीला केरळ येथील वकिलास दत्तक दिले.

याप्रकरणी जबरदस्तीने आरोपीने पीडितेच्या सह्या घेतल्या होत्या, अशी माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. पीडीत मुलगी पुन्हा गर्भवती आहे. हा प्रकार सन २०१५ ते एप्रिल २०१७ या कालावधीत घडला असून आरोपी रोशन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरच्या दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्कच्या अधीक्षक जाधव निलंबित

News Desk

बायकोच्या लफडेबाजाली कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

News Desk

डॉन दाऊद इब्राहीमच्या संपत्तीसाठी लागली 11 कोटींची बोली

News Desk