HW News Marathi
क्राइम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाजारातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी (NSE) ईडीने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज (8 डिसेंबर) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडल्यामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल

Aprna

कुरिअर बॉय म्हणून घरात घूसून लुटले दोन कोटी

News Desk