HW News Marathi
क्राइम

महिलेचा मुदडा पाडून लुटले २४ तोळे सोने

उदगांव (कोल्हापूर) : घरात एक दोन नव्हे, तर तब्बल नऊ जण असतानाही सशस्त्र दरोडेखोरांनी निर्घृण हल्ला चढवित एका महिलाचा मुदडा पाडल्याची थरारक घटना रविवारी मध्यरात्री कोल्हापुरात घडली. या वेळी दरोडेखोरांनी २४ तोळ्यांचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लुटून नेला.

उदगांव – शिरोळ मार्गावरील निकम मळ्यात बाबूराव नारायण निकम यांच्या घरावर हा भीषण दरोडा टाकण्यात आला. या वेळी दरोडेखोरांनी शेजाऱ्यांच्या घरांना कड्या लावून घेतल्याने कुणीही त्यांच्या मदतीला येऊ शकले नाही. या वेळी दरोडेखोरांच्या हल्ल्यात अरुणा बाबूराव निकम (56) यांचा जागीच मृ्त्यू झाला, तर बाबूराव गंभीर जखमी झाले आहेत. दरोड्याच्या वेळी घरात दोन मुले सुना व नातवंडासह एकूण नऊ जण होते. या घटनेमुळे उदगांव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

News Desk

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

News Desk

पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदारा विरोधातच

News Desk