HW News Marathi
क्राइम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात CBI ‘या’ प्रकरणी केला गुन्हा दाखल

मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आज (८ जुलै) संजय पांडेंवर एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांचा बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने संजय पांडेंच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरावर छापे मारण्यास सुरुवात केली आहे.
संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

संबंधित बातम्या
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चे समन्स
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असह्य विवाहितेवर वारंवार बलात्कार

News Desk

पुणे अडीच वर्षांच्या चिमुकलीची अपहरण करून हत्या

News Desk

“जर पोलिसांनी मला मदत केली असती तर…”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Aprna