मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आज (८ जुलै) संजय पांडेंवर एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांचा बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने संजय पांडेंच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरावर छापे मारण्यास सुरुवात केली आहे.
संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.
CBI searches underway across India on the orders of MHA. The agency registered a fresh case against ex-NSE chief Chitra Ramakrishna, Ravi Narain and former Mumbai Commissioner Sanjay Pandey for allegedly tapping phones of NSE officials and other irregularities: CBI Sources
— ANI (@ANI) July 8, 2022
संबंधित बातम्या
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चे समन्स
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.