HW News Marathi
क्राइम

भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना उडविले

उत्तम बाबळे

भोकर येथून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने भोकर न.प.समोरील पुलाजवळ २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी स्वारास उडविले. या भिषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

विठ्ठल दत्ता जाधव (३९) रा.धारजणी तांडा ता.भोकर हे पत्नी लक्ष्मीबाई हिस घेऊन त्यांच्या दुचाकी क्र.एम.एच.२६ एक्स ४१५२ वरुन नांदेडहून गावाकडे जात असतांना व कोंडीबा रामजी तायवाडे(२२)रा.रावणगाव(मनाठा)ता.हदगाव हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२६ झेड १६५३ वरुन भोकरहून गावी जातांना दि.२३आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान भोकर – नांदेड महामार्गावरील भोकर नगर परिषदे समोरील पुलाजवळ सिमेंट घेऊन भरधाव वेगात नांदेडकडे जात असलेल्या ट्रक क्र. एम.२६ – ८६९६ ने उपरोक्त दोन्ही मोटार सायकल स्वारांना उडविले.या भिषण अपघातात विठ्ठल दत्ता जाधव व कोंडीबा तायवाडे हे जागीच ठार झाले असून यातील विठ्ठल यांची पत्नी लक्ष्मीबाई विठ्ठल जाधव ही महिला दूरवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली आहे. सदर महिलेस भोकरच्या क्रीटीकल केअर हॉस्पिटल मध्ये तातडीने दाखल करण्यात आले व प्रथमोपचारानंतर अधिक उपचारार्थ तिची नांदेडला रवानगी करण्यात आली आहे.भोकर पोलीसांनी पाठलाग करुन व बारड पोलीसांनी नाकाबंदी करुन या अपघातातील पळ काढलेल्या तो ट्रक बारड येथे पकडला असून अपघात प्रकरणी भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जळगावात ट्रकवर दगडफेक

News Desk

आदिवासी वि. प्र.लिपीक रमेश मुंडकर लाच घेताना रंगे हात अटक

News Desk

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

News Desk