HW News Marathi
देश / विदेश

टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करीत पोलिसांनीच केली लुटालूट

मथुरा – रक्षकच भक्ष्यक बनल्याचा प्रकार मंगळवारी मथुरेत पाहायला मिळाला. टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करीत सहा पोलिसांनी येथील टोलनाक्यावरील तब्बल चाळीस हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची धक्कादायक घटना येथे घडली. याप्रकरणी आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग२ वरील टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा हा धुमाकूळसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मंगळवारी संध्याकाळी सर्कल ऑफिसर नितीन सिंह फरह इथून मथुराच्या दिशेने जात होते. महुअन टोलनाक्याच्या बूथ १३ जवळून त्यांची गाडी जात असताना तेथे असलेला बॅरिअर त्यांच्या गाडीवर पडला. त्यामुळे सीओ नितीन सिंह यांचा पार चढला. यानंतर सीओ आणि त्यांच्यासोबत असलेले इतर पोलीस गाडीतून उतरले आणि त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह वाद घालायला सुरुवात केली.

हा सगळा प्रकार सुरू असताना तेथे असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने टोल बूथमध्ये असणाऱ्या पैशांवर डल्ला मारला. तो पोलीस कर्मचारी बूथमधून पैसे उचलताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी बूथमधील पैसे नेले असा आरोप टोलकर्मचारी करत आहेत. पोलीस आणि टोल अधिकारी यांच्यातील बाचाबाची एक तास चालली. पण एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्या टोलनाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली, असा आरोप होतो आहे. याप्रकरणीमथुरामधील सहा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची सुटका

swarit

एका व्यक्तीच्या खोट्या, तथ्यहीन आरोपांमुळे मला पदावरून हटविले !

News Desk

व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा, स्मृती इराणी यांच्याकडे पदाभार

News Desk