HW News Marathi
क्राइम

कौमार्य चाचणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पुण्यात तिघांवर हल्ला

पुणेः कांजरभाट समाजातील रुढी परंपरामुळे वाद झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. काही तरुणांनी कौमार्य चाचणी प्रथेला विरोध दर्शवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम उघड़ली होती. त्या तरुणांना समाजातील जमावाने मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुरोगामी पुण्यात आजही रुढी परंपरा किती खोलवर रुजल्या आहेत. याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील काही तरुणांनी कौमार्य चाचणी थांबवा असे अभियान हाती घेतले आहेत. यास समाजातील काही जुन्या विचारसरणीच्या नागिरकांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Gauri Tilekar

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार

Aprna