HW News Marathi
क्राइम

अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या 36 तासात शोधून काढले

सलीम शेख

परभणी य़ेथे एका अल्पवयचीन मुलाची अपहरण झाल्याची घटना समोरी आहे. ही घटना बुधवारी घडली असून याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या 36 तसात दोघींना अटक केली आहे. जिलानी खाजा सिकलकर आणि कलीम शहानूर सिकलकर असे आरोपीचे नाव आहेत. पोलिसांच्या या कामगीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

आरोपी

आरोपी

बुधवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा़ शहरातील ईदगाह मैदानावरून दोन आरोपींनी १२ वर्षीय अभिषेक दावलबाजे मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथक नेमले आणि ३६ घंटे प्रयत्न आरोपींना गुरूवारी रात्री अटक केले. एखाद्या चित्रपटातील मन हेलवणारे अपहरणाचे नाट्य ज्या पध्दतीने दाखवले जाते त्याच प्रकरे या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष अनुभवले़ परभणीतून अपहरण केलेल्या मुलाला आरोपींने हैद्राबाद नेले त्यानंतर उदगीर आणले. परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानात मुलांची गर्दी पाहून दोन अज्ञात व्यक्ती खेळणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी येत होते़ खेळतांना कोणी षटकार मारला तर त्याला दहा, वीस रूपये बक्षीस म्हणून हे व्यक्ती देऊ लागले़ चांगले खेळल्यानंतर पाणीपुरी खाऊ घालण्याचे आमिषही दाखवू लागले़ रविवार २२ ऑक्टोबरपासून या व्यक्तींचा हा परीपाठ सुरू झाला होता़. खेळणाऱ्या मुलांनाही यामुळे प्रोत्साहन मिळत असे़ या व्यक्तींसोबत खेळणाऱ्या मुलांचे अगदी मित्रत्वाचे नाते तयार झाले होते़. खेळण्यात चुणूक दाखविणाऱ्या शहरातील गोरक्षण रोडवरील गवळी गल्लीतील अभिषेक दावलबाजे या व्यक्तीने दाखविलेल्या आमिषांकडे आकर्षित झाला होता़. मंगळवार २४ ऑक्टोबरच्या सायंकाळी या व्यक्तींनी बुधवारी सकाळी लवकर मैदानावर ये तुला बॅट घेऊन देतो, असे आमिष अभिषेकला दिली. याबाबत त्याने आई उषा आणि वडील अन्सीराम दावलबाजे यांना संध्याकाळी सांगितले़ उद्या आपल्याला बॅट मिळणार,असे स्वप्न उराशी घेऊन अभिषेक बुधवारच्या सकाळची वाट पाहत होता़ बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अभिषेक ईदगाह मैदानावर पोहोचला आणि सदर व्यक्तींची वाट पाहत थांबला़ यावेळी समोरून येणाऱ्या दोघा व्यक्तींनी त्याला सोबत घेतले आणि एका कारमध्ये बसवून बॅट घेण्यासाठी निघाले़ या व्यक्तींच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाजही न बांधता आलेल्या १२ वर्षीय अभिषेकला काही कळालेच नाही़ तो अगदी मित्रत्वाच्या नात्याने या दोघांसोबत कारमध्ये बसला़ यावेळी परभणीत नाही आपण दुसरीकडे चांगली बॅट मिळते तेथे बॅट घेऊ असे सांगून त्याला परळीकडे नेले़ त्यानंतर या व्यक्तींनी आपले अपहरण केले असावे याची जाणिवही अभिषेकला नव्हती़ ही घटना बुधवार २५ ऑक्टोबरच्या सकाळची होती़ त्यानंतर अभिषेक घरच्यासोबत कोठे बाहेरगावी फिरायला निघालोत या अविर्भावात गेला होता़.

अभिषेक दुपार झाली तरी घरी आला नाही या चिंतेत असतांना आई उषा आणि वडील अन्सीराम दावलबाजे यांनी अभिषेकची शोधाशोध करण्यास सुरूवात केली़ त्याला कोणीतरी बॅट घेऊन देणार होते याची माहिती असल्याने त्यांनी त्याच्या मित्रांकडे चौकशीही केली; परंतु त्यांना याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. सायंकाळ झाली तरी अभिषेकचा मिळून येत नसल्याने शेवटी दावलबाजे कुटुंबीयांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली़ त्यांच्या माहितीवरून अभिषेकचे अपहरण झाले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त करून गुरनं ४१५/१७ मध्ये भादंवि ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंद केला़

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्याकडे आला़ अपहरणाच्या या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सचिन द्रोणाचार्य आणि नानलपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी कामाला लागले़ ईदगाह मैदानावर नियमितपणे येणाऱ्या आणि अभिषेकला बॅट घेऊन देण्याचे आमिष दाखविणाऱ्या त्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू केले़ अभिषेक सोबत खेळणाऱ्या मित्रांकडून आरोपींचे वर्णन घेऊन त्या पध्दतीने नानलपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री स्केचही तयार करून घेतले़ हे स्केच विविध सोशल मिडियातून पोस्ट करून तपास यंत्रणा आणि नागरिकांपर्यंत पाठविण्यात आले़ यात अभिषेकचा फोटो आणि आरोपींचे स्केचही सर्वांना पाठविण्यात आले़ या संदर्भात पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनाही माहिती दिली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी मुलाच्या शोधासाठी नानलपेठ आणि स्थानिक गुन्हा शाखेची पथके तयार करून गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना दिल्या़ बुधवारी रात्रीपासून परभणी पोलीस दलातील सर्व तपास यंत्रणा याच कामासाठी लागल्या़ अभिषेक हा आपल्या घरचा सदस्य आहे आणि त्याचे अपहरण झाले आहे, त्याचा शोध घेणे आपल्यासाठी अगदी आवश्यक असल्याची खुणगाठ उराशी बाळगून तपास काम सुरू केले़ गुरूवारी सकाळपर्यंत परभणी शहरासह विविध भागातील नागरिकांच्या मोबाईलवर मुलाच्या अपहरणाची बातमी पोहोचली होती़.

दरम्यान, गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्सीराम दावलबाजे यांना हैद्राबाद येथून एक फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने त्यांचे मुलाशी बोलणे करून दिले आणि मुलगा पाहिजे असेल तर २० लाख रूपयांची खंडणी मागितली़ त्यानंतर या व्यक्तींनी आपल्या मुलाचे अपहरण केल्याची खात्री झाली़ हे अपहरण पैशांसाठी झाले आहे हेही लक्षात आले़ तपास करणाऱ्या पोलीस पथकासही सदरील माहिती देण्यात आली़ त्यानंतर आता अपहरणकत्र्याच्या अपेक्षा आणि त्यांचा प्लॅन यावर लक्ष ठेवून पुढील तपास सुरू करावा, अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या़ गुरूवारी सकाळपासून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी या कामात तपास करणाऱ्या पथकांना तशा सूचना देण्याचे काम सुरू केले़ आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून अन्सीराम दावलबाजे यांना फोन येण्यास सुरूवात झाली़ सुरूवातीला अन्सीराम दावलबाजे यांनी २० लाख रूपये देणे शक्य नसल्याचे सांगितले़ तेव्हा आरोपींनी खंडणीची रक्कम कमी करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर तीन एक लाख रूपयांपर्यंत रक्कम जमा होईल, असे सांगितले़ जेवढी रक्कम जमा होईल तेवढी रक्कम घेऊन हैद्राबादकडे येण्यास त्यांना सांगितले़ त्यानंतर पोलिसांनीही काही रक्कम जमा करून अन्सीराम दावलबाजे यांच्याकडे जवळपास साडेतीन लाख रूपये दिले़ एक कारही त्यांना देण्यात आली़ ही कार चालविण्याची जबाबदारी नानलपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सय्यद उमर यांना देण्यात आली़

त्यानंतर तपासातील सर्व पथके या कारसोबत कधी मागे, कधी पुढे अशा पध्दतीने जाण्यास सुरूवात झाली़ यावेळी तपास पथके अन्य वाहनांतून होते़ या तपास पथकासोबत आरोपींना ओळखणारी दोन मुले देखील होती़ गंगाखेड मार्गे पालम, लोहा आणि अहमदपूरकडे कार जात असतांनाच पुन्हा आरोपींचा फोन आला आणि कोठे आहात? अशी विचारणा करण्यात आली़ यावेळी त्यांनी लोहा येथे असल्याचे सांगितले़ त्यानंतर तुम्हाला विकाराबादकडे येण्यास किती वेळ लागेल? असे विचारले असता त्यांनी पाच ते सहा तास लागतील, असे सांगितले़ त्यावेळी आरोपींनी इतका वेळ लागेल का ? अशी विचारणा करून उदगीर जवळ ावळ आल्यावर पुन्हा फोन करण्यास सांगितले़ आरोपींच्या सूचनेप्रमाणे पुढील काही तास कार उदगीरकडे चालत होती़ उदगीरजवळ पोहोचल्यानंतर आरोपींना त्याची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी आहात तेथे थांबण्यास सांगितले़ या वेळी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले वेशांतर करून कार परिसरातील वेगवेगळ्या भागात सापळा लावला़ परंतु या ठिकाणी आरोपी आलेच नाहीत़ आम्ही मोटारसायकलने तुमच्याकडे येतो आणि तुम्ही पैशाची कॅरिबॅग आमच्याकडे द्या, असे सांगितले़ त्या पध्दतीने पोलिसांनाही उदगीर परिसरातून मोटारसायकलची व्यवस्था केली़ परंतु आरोपी तेथे आलेच नाहीत आणि त्यांनी थोडे पुढे येऊन एका शेताजवळील गवतात पैशाची कॅरीबॅग फेकण्यास सांगितले़ त्यापध्दतीने आरोपींनी सांगितलेल्या जागी रक्कम ठेवण्यात आली़ त्यानंतर आरोपींनी तुमचा मुलगा उदगीर बसस्थानकाच्या फलाट क्रमांक सात वर मिळेल असे सांगितले़ रक्कम ठेवल्यानंतर कार वेगाने बसस्थानक परिसराकडे निघाली़ याबाबत कार चालकांने पथकास माहिती दिली़ यावेळी रक्कम असलेल्या ठिकाणी आणि बसस्थानकावर सापळा लावण्यात आला़ परंतु अभिषेक तेथे नव्हता, आणि दुसरीकडे रक्कम उचलण्यासही कोणी आले नाही़ पुन्हा आरोपींनी दावलबाजे यांना फोन करून तुम्ही तुमच्या सोबत पोलीस असल्याचे सांगून त्यांना कोणतीही माहिती न देता पुन्हा रक्कम जेथे टाकली तेथून घेऊन या असे सांगितले़ त्यानंतर ते पुन्हा सदर ठिकाणी आले आणि त्यांनी रक्कम उचलून आरोपींच्या फोनची वाट पाहण्यास सुरूवात केली़ अपहरणकत्र्यांचा हा खेळ पोलीस यंत्रणेला चक्रावून टाकण्यासाठी सुरू असतांना अन्सीराम दावलबाजे यांना आपल्या मुलाची काळजी वाटू लागली़

दरम्यान, परभणीसह उदगीर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही याच कामात गुंतले होते़ जवळपास ४० हून अधिक पोलीस कर्मचारी आरोपींना ताब्यात घेऊन अभिषेक देखील सुखरूप राहिला पाहीजे याकरीता धडपड करीत होते़ रक्कम उचलून घेतल्यानंतर आरोपींनी अन्सीराम यांना रेल्वेस्टेशनकडे बोलावले़ रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक जागा सांगून तेथील गवतावर रक्कम ठेवण्यास सांगून मुलगा स्टेशनवर मिळेल, असे सांगितले़ रक्कम ठेवण्याची वेळ आल्यावर आरोपींनी त्यांना स्टेशनमध्ये बोलावून या ठिकाणी उभे असलेल्या मालगाडीच्या डब्याच्या बाजूला ठेवण्यास सांगितले़ हा डबा रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या समोराचा होता़ या ठिकाणी रक्कम ठेवल्यानंतर अन्सीराम यांनी तेथून स्टेशन परिसरात मुलाचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही़ रक्कम उचलण्यासाठी कोणी येते का? यावर पोलीस पथके नजर ठेवून होते़ यात एक ते दीड तासाचा वेळ जाऊनही रक्कम घेण्यासाठी कोणीच आले नाही़ असाच वेळ जात असल्याचे पाहून ही रक्कम उचलण्यास सांगण्यात आले़ रक्कम उचलून घेतल्यानंतर हैद्राबादकडे जाणाऱ्या ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सिग्नल आणि गेटजवळ हे पैसे ठेवण्यास सांगण्यात आले़ रात्रीच्या वेळी या जागेकडे अधिकची वाहतूक नसल्याने पोलिसांना सापळा लावणे कठीण होत असतांनाच उदगीरचे मुळ रहिवासी असलेल्या अनिल सनगले यांनी स्टेशन परिसरातील आणि सदर जागा परिसरातील मुख्य मार्ग आणि परिसरातील अन्य मार्गावर साध्या वेषातील पोलीस कर्मचारी तैनात केले़ सदर जागेवर पैसे ठेवल्यानंतर अभिषेक हा स्टेशनच्या रेस्टरूममध्ये असल्याचे त्यांना सांगितले़ अन्सीराम दावलबाजे मुलास भेटण्यासाठी उत्सुक असतांना त्यांनी स्टेशनकडे पळ काढला़ दरम्यान, पैशाची कॅरीबॅग पाहून थोडासा अंदाज घेऊन एका व्यक्तीने परिसरात चकरा मारण्यास सुरूवात केली़ कोणी आपल्याला पाहणार नाही याचा अंदाज आल्यानंतर त्या व्यक्तीने ती थैली उचलली आणि रोडकडे पळण्यास सुरूवात केली़ यावेळी एक ऑटो या मार्गाने जात असल्याने तो त्या ऑटोत बसला़ परंतु या ऑटोत अगोदरपासूनच पोलीस कर्मचारी असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही़ त्यानंतर ऑटोमध्ये बसताच ऑटोमधील आणि परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि मुलगा कोठे आहे? अशी विचारणा केली़ आपण पकडले गेलोत आणि आता आपले खरे नाही याची जाणीव होताच सदर आरोपीने मुलगा परिसरातील एका रोडवरील टेम्पोजवळ अन्य आरोपीकडे असल्याचे सांगितले़ ही माहिती तात्काळ परिसरातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आणि त्यांनी ऑटो टेम्पोकडे नेण्यास सुरूवात केली़ याठिकाणी अभिषेकला घेऊन उभ्या असलेल्या आरोपीस काहीतरी वेगळे होत असल्याची जाणीव झाल्याने तो पळण्याच्या प्रयत्नात असतांनाच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्या तावडीतून अभिषेकची सुटका केली़ प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात आल्यानंतर आणि अभिषेक सुखरूप आल्यानंतर स्टेशनवर त्याला शोधण्यासाठी गेलेल्या अन्सीराम यांना बोलावण्यात आले़

गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला अपहरणकर्ते, पालक आणि पोलीस पथकांतील हा आंधळी कोशिंबीरीचा खेळ रात्री १०़ ३० वाजण्याच्या सुमारास संपला होता़ अभिषेक आणि त्याचे वडील अन्सीराम एकमेकांना भेटले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले़ हे दृश्य पाहून परिसरात उभ्या असलेल्या २५ हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले़ अपहरण झाल्यानंतरच्या ३६ तासात जे काही घडले ते एखाद्या चित्रपटात घडावे असा घटनाक्रम परभणी पोलिसांनी अनुभवला होता़ या प्रकरणातील तपासाला आलेले यश हे परभणी पोलीस दलासाठी ऐतिहासिक होते़ या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना आकाश ठेंगणे झाले होते़ आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती परभणी येथे देण्यात आली़ त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांची पथके आरोपींना घेऊन परभणीत पोहोचले़ परभणी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांपासून अभिषेकच्या पालकांपर्यंत सर्वांनीच समाधान व्यक्त केले़

या कामगिरीत पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, तपास अधिकारी सचिन द्रोणाचार्य, सुनील पुंगळे, अनील सनगल्ले, किरण भुमकर, सय्यद उमर, संजय पुरी, एऩव्ही़आघाव, एम़एस़बुधवंत यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, प्रकाश कापुरे, हनुमंत जक्कावाड, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, चंद्रकांत टाकरस, सारबर पथकातील गणेश कौटकर, राजेश आगाशे आणि उदगीर येथील स्थानिक पोलिसांनी सहभाग नोंदविला़

गुरूवारी रात्री ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपींची माहिती घेतली असता आरोपींनी त्यांची नावे जिलानी खाजा सिकलकर आणि कलीम शहानूर सिकलकर असे सांगितले़ दोघे एकमेकांचे चुलत भाऊ असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी आहेत़ आरोपींनी ज्या पध्दतीने अपहरणाच्या घटनेला रंग दिला त्यावरून त्यांनी कोणताही धोका न पत्कारता प्रकरणातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले़ २२ ते २४ वर्षाच्या या तरूण आरोपींनी अनेकवेळा पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रत्येकवेळी आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळतील आणि आपले काम सोपे होईल या लोभापोटी आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले़ त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी केलेले हे शर्तीचे प्रयत्न शेवटी पोलिसांना यश देऊन गेले़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौमार्य चाचणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पुण्यात तिघांवर हल्ला

swarit

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

Aprna

उपसरपंचाचा निर्घृण खून

News Desk