HW News Marathi
क्राइम

गर्भवती महिलेला कारखाली चिरडले

नवी दिल्ली- अटेंडंटच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नोएडाच्या सेक्टर १८ मध्ये घडलीय. येथील एका मार्केटमध्ये ही महिला पतीसह शॉपिंग करण्यासाठी आली होती. या दरम्यान पार्किग एरियामध्ये पार्किंग अटेंडंटने गाडीवरील नियंत्रण गमावत कारखाली या गर्भवती महिलेला चिरडले. या अपघातानंतर या महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे या घटनेत महिलेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला आहे. या घटनेत महिलेच्या पतीला देखील गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी अटेंडंटला ताब्यात घेतलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हत्या करून पत्नीला घरातच पुरले

News Desk

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा

News Desk

“हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”- नितेश राणे

News Desk