HW News Marathi
क्राइम

प्रियकराला भेण्यसाठी पतीने विरोध केला म्हणून पत्नीने पतीचा काटा काढला

गया : प्रियकला भेटण्यासाठी पती विरोध करत होता म्हणून पत्नीने पतीचा काटा काढला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली . मृताचे नाव दीपक कुमर आहे. दीपकच्या घरच्यांनी पत्नी प्रयंकावर खूनाचा आरोप केला आहे. प्रियंकाचे अवैध संबंध होते. तिचा प्रयकर आणि तिने कट रचल्याचा आरोप नातेवाईकाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना गया जिल्हयातील रामपूर येथे मंगळवारी घडली आहे. प्रयंका आणि दीपक चार वर्षापूर प्रेम विवाह केले होते मात्र तीन वर्षानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. दोघात दुरावा निर्माण झाल्याने प्रियंकाचे दुस-या तरूणाशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले.ती पती आणि सासरच्या लोकांना लपूनछपून आपल्या प्रियकराला भेटायला जात होती. जेव्हा दीपकला या संबंधांची कुणकुण लागली तेव्हा त्याने तिला रोखले आणि विरोध केला. प्रियकराला भेटायला बंदी घातल्याने प्रियंकाने पतीच्या खुनाचा कट रचला. काही दिवसापूर्वी दीपकाला झोपेत मारण्याचा प्रयत्न केला मात्र दीपक जागे झाल्याने तो वाचला होता.

सोमवारी रात्री कुणीतरी कॉल करून घराबाहेर दीपकला बोलवले होते. कॉल करणा-यांने दीपकला कारने बाहेर जायचे आहे असे सांगितले होते. सकाळी कारमध्ये दीपकचा मृतदेह अढळला. दीपकचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. दीपक कार किरायाने चालवत होता. याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुस-या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर हल्ला

News Desk

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

मालकाच्याचं घरी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक; 46 लाखांच्या मालमत्तेस बिहारमधून घेतले ताब्यात

Chetan Kirdat