HW News Marathi
क्राइम

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1400 कोटीचे ड्रग्ज केले जप्त

मुंबई | बेकायदेशीररीत्या ड्रग्ज विकून झटपट पैसा कमवण्यासाठी ड्रग्ज विक्रेत्याने चक्क आपल्या उच्च शिक्षणाचा वापर करून मेफेड्रोन (MD) तयार करून विकत होता. मुंबई पोलिसांनी तब्बल 700 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई गुन्हे शाखाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने पाच जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या मुख्य आरोपीने रसायन शास्त्रामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे (Organic Chemistry) शिक्षण घेतलेले आहे. तो वेगवेगळे केमिकल एकत्रित करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करत MD (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तयार करत होता. आरोपीने ड्रग्ज तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले होते. झटपट पैसा कमवण्यासाठी त्याने जोडीदारांच्या मदतीने ड्रग्जच्या निर्मितीला सुरुवात केली होती.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरळी युनिटने पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 701 किलो 740 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याची किंमत तब्बल 1403 कोटी 48 लाख रुपये आहे. आरोपी हे मुंबई शहर व परिसरात मोठया प्रमाणात अंमली पदार्थाचा पुरवठा करत होते. अवैधपणे अंमली पदार्थाची निर्मिती करुन त्याचा व्यापार करणाऱ्या मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) अधिकाऱ्यांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च 2022 मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून 250 ग्रॅम MD जप्त केले होते. त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी करून पोलिसांनी पुरवठा साखळीचा संबंध प्रस्थापित केला. त्यामुळे या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, जे घाऊक पुरवठादार (Wholesale Supplier) आहेत.

आरोपी हा मागणीप्रमाणे MD (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विकत होता. तो फक्त 250 ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्जचा व्यवहार करत होता. तसेच स्वत:ची ओळख लपविण्यासाठी सदर आरोपी वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी नालासोपारा येथील एका कारखान्याचा पर्दाफाश करून अमली पदार्थ जप्त केले आहेत. यापूर्वी आरोपींनी मुंबई आणि उपनगरात चार ते पाच वेळा एवढा मोठा माल पुरवठा केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

News Desk

“जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी IRSची नोकरी मिळवली” ?

News Desk

साप चावल्यानं तरूणीचा मृत्यू

News Desk