HW News Marathi
क्राइम

तीन वर्षाच्या अपह्रत मुलाची सुखरूप सुटका

नवी मुंबई- वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून अपह्रत मुलगा रघु नाना शिंदे (3) हा कळवा येथे मिळून आला. एका गर्दुल्याने शनिवारी भरदिवसा या मुलाचे अपहरण केले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. अपहरणकर्ता व्यसनी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत होते. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास करून कळवा येथून मुलाला व त्या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती गर्दुला असून नशेत त्याने मुलाचे अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुलाला विकून तो नशेसाठी पैसे मिळवणार होता का, याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान अपह्रत मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

News Desk

आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड

News Desk

फलाहारी बाबावर बलात्काराचा गुन्हा

News Desk