HW News Marathi
क्राइम

उल्हासनगरात झेरॉक्स नोटा चालवणारे दोघे अटकेत

गुन्हे शाखेने सापळा रचून केली कारवाई उल्हासनगर (गौतम वाघ): चलनी नोटांची कलर झेरॉक्स काढून चालवण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना उल्हासनगरात पकडण्यात आलंय. त्यांच्याकडून ५००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या कलर झेरॉक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

विनोद प्रकाश शहा आणि अरुण गुरव अशी या दोघांची नावं असून ते दोघेही पनवेलचे राहणारे आहेत. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ते उल्हासनगरच्या ऍम्ब्रोशिया हॉटेल परिसरात खोट्या नोटा चालवण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून एकूण २१ हजार ५५० रुपये इतक्या किंमतीच्या नोटांच्या कलर झेरॉक्स पोलिसांनी जप्त केल्या असून न्यायालयानं त्यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात ८ मे च्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

News Desk

आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

News Desk