HW News Marathi
क्राइम

मुंबईत एकाच महिन्याच्या आत शौचालयाच्या वादातून दोन जणांचा बळी 

मुंबई । एका आठवड्या आधी वडाळ्यात शौचालयात जास्त वेळ बसण्यावरून फुलचंद यादव या वृध्दाची हत्या केल्याची घटना ताजी असताना. आता अंधेरीच्या साकीनाका परिसरात पुन्हा अशीच एक आणखी घटना घडली आहे. शौचालयाचा दरवाजा ठोठावल्याच्या कारणातून झालेल्या हाणामारीत एकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. गणेश किर्लोस्कर असे मृत तरुणाचे नाव असून साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी प्रविण गावडे याला अटक केली आहे.

साकीनाका येथील तानाजी नगर-सफेद पूल परिसरात राहणारा गणेश किर्लोस्कर शनिवारी दुपारी येथील सार्वजनिक शौचालयामध्ये शौचास बसला होता. यावेळी प्रविण गावडे याच्या पुतण्याने बाहेरून दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावला म्हणून संतापलेल्या गणेशने बाहेर येऊन गावडे याच्या पुतण्याच्या कानाखाली मारली. पुतण्याला का मारले असे विचारत प्रवीण गणेशच्या अंगावर धावून गेला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. प्रवीणने लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HW Exclusive : उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; 250 कोटींचं कर्जफेड प्रकरणात समन्स

Chetan Kirdat

संजय दत्तला कुठलीही सवलत नाही

News Desk

तासगावमधील सराफासह चौघे तडीपार!आणखी रडारवर

News Desk
मुंबई

मुलुंड डम्पिंग ग्राउंड उद्यापासून बंद, कचऱ्याचा भार कांजूर आणि देवनारवर 

swarit

मुंबई । तब्बल दहा वर्षांपासून बंद होण्याच्या प्रतीक्षेत असलेले मुलुंड डम्पिंग ग्राऊंड सोमवारपासून शास्त्रोक्त पद्धतीने बंद होणार आहे. सोमवारपासून या डम्पिंग ग्राऊंडवर ‘बायोकल्चर’ पद्धतीने कचऱ्याचे विघटन करून खतनिर्मिती केली जाणार आहे. दररोज ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी ५५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुलुंड हे गोराईनंतर बंद होणारे मुंबईतील दुसरे डम्पिंग ग्राऊंड ठरणार आहे.

हे डम्पिंग बंद झाल्यामुळे मुलुंड व ठाण्यातील हरीओम नगर, तुकाराम नगर परिसरासह इतर भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबईतील कचऱ्याचा भार उचलणाऱ्या प्रमुख डम्पिंग ग्राउंड पैकी एक असलेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंड उद्यापासून बंद होत आहेत. या डम्पिंग ग्राउंडवर दररोज जमा होणारा दीड हजार मेट्रिक टन कचरा आता कांजूरमार्ग व देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे. मात्र मुलुंडपाठोपाठ देवनार डम्पिंग ग्राउंडचीही क्षमता संपत आल्याने मुंबईत ऐन सणासुदीत कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून होत होती. डम्पिंग परिसरातील नागरिकांनी मागील काही वर्षांत मोठी आंदोलने उभारली होती. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे. यासाठी पालिका ७३१ कोटी रुपये खर्च करणार आहेत.

गेल्या दीड वर्षापासून मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी महापालिकेला ठेकेदारच मिळत नव्हता. अखेर ठेकेदार मिळाल्याने हे डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येणार आहे. सध्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दीड ते दोन हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर हा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथे वळविण्यात येणार आहे.

Related posts

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत

News Desk

मराठा-दलित समाजात फूट पाडण्याचा डाव

News Desk

… तर मुंबई वाहतूक पोलिसांनी कोटयावधी रुपयांच्या कमाईवर सोडले पाणी

News Desk