HW News Marathi
क्राइम

आदिवासी विकासमंत्र्यांच्याच तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्याची आत्महत्या

नागनाथ बाबर – 9321430348

पालघर – जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द गावातील वस्तीगृहात एका आदिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या तालुक्यातच ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. आंबिस्ते खुर्द या गावातील पद्मश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असलेला रुपेश शिवराम वाढू (१६वर्ष) याने आज दुपारी गळफास लावून वस्तीगृहातच आत्महत्या केली आहे.

आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून मयत विद्यार्थी हा विक्रमगड तालुक्यातील खडकी (रिंजड पाडा) तलवाडा येथील रहिवासी आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. एकंदरीत पाहता पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

News Desk

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

डॉन दाऊद इब्राहीमच्या संपत्तीसाठी लागली 11 कोटींची बोली

News Desk
देश / विदेश

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

सेकंदांचा हिशोब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाचा जगाला पुन्हा एकदा प्रत्यय

टोकियो : ‘प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत अशा अनेक प्रकारच्या अनाउंसमेंट आपण आल्यादिवशी भारतातील रेल्वे स्टेशन्सवर ऐकत असतो. भारतातल्या रेल्वेगाड्या उशीराने धावणे अथवा रद्द होणे आपल्यासाठी नवीन नाही. त्यातच एखादी गाडी वेळेत प्लॅटफॉर्म वरुन सुटली तर आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसतो. मात्र जपानमध्ये काहीसा वेगळा प्रकार घडलाय. जपानमध्ये एका खाजगी कंपनीची रेल्वेगाडी वेळेच्या २० सेकंद आधी सुटल्यामुळे या कंपनीने दिलगीरी व्यक्त केली आहे. टोकियोच्या मिनामी नागारेयामा या रेल्वे स्टेशनवरुन सुकुबा एक्सप्रेस या गाडीची सुटण्याची वेळ ९ वाजून ४४ मिनीटं ४० सेकंद अशी होती. मात्र मंगळवारी या गाडीने २० सेकंद लवकर प्लॅटफॉर्म सोडला. या घटनेनंतर संबधित कंपनीने माफी मागत याबाबत कर्मचाऱ्यांना तंबी दिली असल्याचं एका प्रेस रिलीजदवारे नमुद केले. गाडीच्या मोटरमनने गाडीचे वेळापत्रक नीट तपासलं नसल्यानं हा प्रकार घडल्याचं स्पष्टिकरण या कंपनीने दिले आहे. विशेष म्हणजे ही गाडी सुटल्यानंतर लगेचच ४ मिनीटाला दुसरी गाडी होती. मात्र तरीही आपली चुक मान्य करत या कंपनीने प्रवाशांची माफी मागितली. या घटनेमुळे सेकंदांचा हिशेब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आली आहे.

Related posts

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी ९ ऑगस्टला निवडणूक

swarit

मॅगी पुन्हा संकटात

News Desk

शेतकरी आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणात पुढे आलेले एक नाव म्हणजे ‘दीप सिद्धू’, कोण आहे हा?

News Desk