HW News Marathi
क्राइम

डॉन दाऊद इब्राहीमच्या संपत्तीसाठी लागली 11 कोटींची बोली

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आज लिलाव करण्यात आला. दाऊदच्या १० पैकी ३ संपत्तीचा आज 11 कोटीमध्ये लिलाव करण्यात आला. लिलाव करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये डांबरवाला इमारत, शबनम गेस्ट हाऊस आणि अफरोज हॉटेलचा समावेश आहे. एसयुबीटी बुऱ्हाणी ट्रस्टने दाऊदची ही संपत्ती तब्बल 11 कोटी रुपये मोजून घरेदी केली आहेत. यामधील अफरोज हॉटेलचा चार कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर केंद्र सरकारनं दाऊदच्या देशभरातील विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. लिलावाद्वारे त्यांची विक्री केली जात असली तरी दाऊदच्या दहशतीमुळे त्या खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते, परंतु एसयूबीटी बु-हाणी ट्रस्टनं या सर्व मालमत्ता खरेदी केल्या आहेत.

पत्रकार एस बालाकृष्णन यांनी मागील लिलावात या संपत्तीची ४ कोटी २८ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. परंतु ते ही रक्कम देऊ शकले नाही. दरम्यान, दाऊदच्या मालकीचे रौनक अफरोज हॉटेल विकत घेऊन त्या ठिकाणी निशुल्क शौचालय बांधण्याचा निर्धार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पिक्चर अभी बाकी है, मेरा रोल भी अभी बाकी है’- रामदास आठवले

News Desk

मुलावर अॅसिड हल्ला

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंहची तब्येत बिघडली, उद्या न्यायालयात हजर राहणार ?

News Desk