HW News Marathi
क्राइम

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

उत्तम बाबळे

नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे विशेष पोलीस पथक ११ जून रोजी नांदेड जिल्ह्यील उमरी तालुक्यात धडकले व गुप्त माहिती मिळाल्यावरुन उमरी मध्ये चार ठिकाणी छापे टाकून ९ लाख ५० हजार रुपयाच्या गुटख्यासह दोघांना अटक आहे.तर दुस-या छाप्यात क्रिकेट सट्टा जुगार खेळत असलेल्या ठिकाणी देशी दारु व जुगार साहित्य अशा ४५ हजार ७१० रुपयाच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक केली आहे. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर,पोलीस कर्मचारी. काॅ.लाठकर,जगताप,पायनापल्ले,कुलकर्णी,जिंकलवाड,निरणे,चालक पो.ना.सिद्धू हे दि.११ जून २०१७ रोजी उमरी तालुक्यात गस्तीवर असतांना गुप्त माहितीगाराकडून माहिती मिळाली की,राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा साठा उमरी मध्ये प्रभाकर लिंगोजी पडकुलवार रा. सरकारी मार्केट मागील मोकळ्या जागेत व गणेश शामसुंदर भारूका, बालाजी गल्ली यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि तो अवैध रित्या विक्री होत आहे.या माहितीनूसार पथकाने चार ठिकाणी छापे मारले व त्यात पांढ-या पोत्यात भरलेला सागर गोल्ड सितार आणि माणिकचंद कंपनीचा गुटखा जप्त केला.अंदाजे ९ लाख ५० हजार रुपयाचा हा गुटखा जप्त केला व उपरोक्त दोघांना अटक केली. तसेच उमरी येथील विजय पाटील व श्याम सावंत हे गोरठा रस्त्यावरील शटरच्या दुकानात देशी दारु विकत आहेत आणि चालू असलेल्या क्रिकेट खेळावर पैसे लावून सट्टा जुगार खेळवित आहेत अशी गुप्त माहिती मिळाल्यावरुन दुपारी ४:३० वाजता त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे ७ बाॅक्स देशी दारु,क्रिकेट सट्टा खेळविण्यासाठी लावण्यात आलेला टि.व्ही.,हाथवे कंपनीचा सेटटाॅप बाॅक्स,कुलर आणि काही रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ७१० रुपयाचा मुद्देमाल सापडला.तर हा सट्टा जुगार खेळत असलेले शेख इरफान शेख मुनीम (वय ३०), प्रविण कैलास सोळुंके ( १८), पंडीत काशीनाथ जवादवार ( ४४), राजेश नागोबा माहूरकर (४२), माधव समर्थ हैबतकर (३४), विश्वास पंडीत गोवंदे ( ४४ ) आणि प्रल्हाद रामजीत सर्जे (२९) हे सात जण सापडले.घटनास्थळी पंचासमक्ष रितसर पंचनामा करण्यात आला व उपरोक्त मुद्देमालासह ७जणांना अटक करण्यात आली.परंतू हा अड्डा चालविणारे मुख्य सुत्रधार विजय पाटील व श्याम सावंत हे दोघे पाठी माघील भिंतीवरुन उडी मारुन पलायन करण्यात यशस्वी झाले. एकंदरीत उपरोक्त दोन कारवाईत एकूण १० लाख रुपयाचा मुद्देमाल व ९ आरोपी पकडण्यात या पथकाला यश आले असून पहिल्या कारवाईत अन्न व औषधी प्रशासन अधिका-यांना बोलाऊन उमरी पोलीसांत रितसर तक्रार देण्यात आली आणि दुस-या कारवाईत सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिल्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन वर्षाच्या अपह्रत मुलाची सुखरूप सुटका

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

मोठेगाव दलित महिला हत्याकांड निषेधार्थ रिसोडात भीम टायगर सेनेचा रास्तारोको

News Desk