HW News Marathi
क्राइम

गोळीबार करुन पकडला, फरार आरोपी

उत्तम बाबळे

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीने पेरोलवर सुटल्यानंतर मुद्दत संपल्यावर फरार होता. त्यानंतर आरोपीने सतत गुन्हे करत होता. पोलिसांनी २७ जुलै रोजी पहाटे तळणी येथील आखाड्यावर आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केले असता त्याने पोलीसांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीसांनी बचावात्मक गोलीबार केले या गोळीबारात आरोपी संतोष धुतराज जखमी झाला असून जखमी अवस्थेत आरोपीला अटक केले.

आरोपी संतोष धुतराज नादेड येथील प्रभातनगर सन २००५ मध्ये एका मुलीची अपहरण केली होती. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिली यावरून आरोपी संतोष धुतराज अरुण धुतराज,त्याचा मित्र सिधू या तिघांनी मुलीच्या वडीलाची हत्या केली होती. याप्रकरणी या तिघांना जन्म ठेपेची शिक्षा झाली होती. काही दिवसापूर्वी आरोपी संतोष धुतराज पेरोलवर जेलमधून सुटला होता. त्यानंतर आरोपी संतोष जेलमध्ये न जाता परत गुन्हेगारीला सुरूवात केली. दरम्यानच्या काळात त्यांच्या शोध घेत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी संतोषला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांवर तलवारीने वार केला त्याला प्रतीउतर देण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केले यात आरोपी जखमी झाले असात पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले त्यानंतर जेलमध्ये रवाना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

News Desk

HW EXCLUSIVE : पोलीस भरतीत शक्तीवर्धक इंजेक्शनचा बोलबाला; मुंबईतील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

Chetan Kirdat

गावातील अवैध दारु बंद करण्याचे ग्रामरक्षक दलाला अधिकार

News Desk