HW News Marathi
क्राइम

गोवंडीत 3 पिस्तुल, 14 काडतुसांसह दोघांना अटक

प्रतिनिधी-चेतन किर्दत

मुंबई | गोवंडी परिसरातील शिवाजी नगर येथे 3 पिस्तुल आणि 14 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले की, ‘गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (22 जुलै) रात्री उशिरा ३३ वर्षीय ऑटोरिक्षा चालक हकीउल्ला खान आणि ३४ वर्षीय कापड दुकानदार आरिफ सय्यद यांना धारावी येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जौनपूर येथून उत्तर प्रदेशातील आझमगढमार्गे शस्त्रे विकत घेत असत आणि त्यांनी अनेकवेळा येथे शस्त्रे पुरविली असावी असा संशय आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे कारण आरोपींनी यापूर्वी ज्यांना शस्त्रे पुरवली असतील त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दोघांना शस्त्रास्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत अनधिकृत तिकीट दलालांमुळं दहशतवाद्याचा प्रवास?

News Desk

कर्जत वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्याला ५०हजारांची तर नेरळच्या शाखा अभियंत्याला १० हजारांची लाच घेताना अटक

News Desk

“तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका”- क्रांती रेडकर

News Desk