HW News Marathi
क्राइम

तीन बहिणींचा विनयभंग करणा-या ग्रामसेवकासह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

उत्तम बाबळे

नांदेड :- उमरी येथील एका तरणीसह तिच्या अन्य दोन बहिणींचा विनयभंग केल्याची तक्रार २० एप्रिल रोजी दिली.परंतू पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्या पिडीत कुटूंबीयांनी नांदेडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची भेट घेऊन याबाबद कथन केले.त्यानूसार पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरुन उमरी पोलीसांत एका ग्रामसेवकासह त्याच्या कुटूंबातील अन्य सहा जणांविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा तब्बल दीड महिन्यांनी दाखल करण्यात आला आहे. उमरी येथील रहिवासी असलेल्या बाबूराव पेनेवार यांच्या घरात घुसून कुटूंबीयांना ग्रामसेवक मनिष शंकर पेनेवार, अनसूया पेनेवार, धोंडू पेनेवार,राजू गणपत पेनेवार,अजय राजू पेनेवार,विजय पेनेवार, गजानन पेनेवार यांनी २० एप्रिल २०१७ रोजी मारहाण केली.तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत बाबूराव पेनेवार यांच्या एका २० वर्षीय मुलीचा व तिच्या अन्य दोन बहिणींचा विनयभंग केला.उपरोक्त आशयानूसार त्या २० वर्षीय तरुणीने २० एप्रिल रोजी उमरी पोलीसांत तक्रार दिली.परंतू गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली व पिडीत कुटूंबीयांना त्रास देणे,धमकी देणे,शिवीगाळ करण्याचे सत्र त्या ग्रामसेवक कुटूंबीयांकडून सुरुच राहीले.यास कंटाळून पिडीत कुटूंबीयांनी न्याय मागण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे धाव घेतली व घडलेल्या घटनेविषयी कथन केले.या अनुशंगाने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गुन्हा दाखल करण्याबाबद उमरी पोलीसांना आदेशीत केले.यामुळे सदरील प्रकरणी ३१ मे २०१७ रोजी रात्री उशीरा त्या २० वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनूसार तिचा व अन्य दोन बहिणींचा विनयभंग केला ,मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गु.र.न.१०६/१७ कलम १४३,१४७,१८९,३२३,४५२,२९४,३५४,५०४,५०६ भा.द.वि.प्रमाणे उमरी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.उप.नि. ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहेत.परंतू गुन्हा दाखल झाल्याची माहिती दाबून ठवली होती.

सदरील प्रकरण हे भावकीतल्या दोन कुटूंबीयांत मालमत्तेच्या कारणावरुन झाल्याचे कळते.तर या गुन्ह्यातील ग्रामसेवक व अन्य लोक फरार झाले असून दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती उमरी पोलीसांनी दाबून ठेवली होती.परंतू एका गरीब कुटूंबावर अन्याय झाल्याची दखल पोलीस अधीक्षक यांनी घेतली व स्थानिक पत्रकारांनी याचा पाठपुरावा केल्याने दाबून ठेवलेली ही माहिती आज उघड झाली आहे.सदरील गुन्ह्याची माहिती दाबून ठेवण्यामागचे उमरी पोलीसांचे गाेडबंगाल काय ? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

News Desk

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Aprna

बचपन बचाव आंदोलन मुलांचे संरक्षण करणारे कायदे सक्षम करण्याची मागणी

swarit