HW News Marathi
क्राइम

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पुणे कौटुंबिक वादातून उच्चशिक्षित पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वता पतीनेही सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. हडपसर येथील मांजरी फार्म रोड येथील शिवपार्क इमारतीमध्ये बुधवारी दि. १८ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पत्नी फेसबुक आणि व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींशी सतत चॅटींग करीत घरातील खासगी गोष्टींवर चर्चा करत असल्यामुळे पतीने तिचा खून करून नंतर आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनाली राकेश गांगुर्डे (वय ३१, रा. शिवपार्क, मांजरी फार्म रोड, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती राकेश बाळासाहेब गांगुर्डे (वय ३४) याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ हर्षल महेंद्र पवार (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीने बीई कॉम्प्युटर तर राकेशने बीएस्सी, एमबीएपर्यंत शिक्षण घेतले होते. राकेश हा स्वारगेट येथील एका खासगी केमिकल कंपनीमध्ये उच्चपदावर नोकरी करीत होता आणि सोनाली गृहिणी होती. दोघेही मूळचे नाशिकचे असून, त्यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून ते हडपसरजवळील इमारतीत राहत होते. तर सोनालीचे भाऊ हर्षल पवार हे पाषाण येथे रहात होते.

बुधवारी दुपारपासून सोनाली या फोन उचलत नसल्यामुळे त्यांची आई छाया पवार यांनी हर्षल यास फोन करून सोनालीच्या घरी जावून ये, असा निरोप दिला. हर्षल हा त्याचा भाऊ कुणाल, चुलत भाऊ डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, अमोल देवळेकर यांच्यासह शिवपार्क सोसायटीमध्ये बुधवारी रात्री पोहोचला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्यांनी चावीवाल्याला बोलावून घेतले. लॅच लॉकची किल्ली तयार करून घेतल्यावरही दरवाजा उघडला नाही. दरवाजाला आतमधून कडी घातलेली होती. त्यामुळे त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा धक्केमारून उघडण्यात आला. तेव्हा सोनाली बेडवर निपचीत पडलेली होती, तर राकेशने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सोनाली ही फेसबुक, वॉट्सअँपवर मित्रमैत्रिणींशी चॅटिंग करीत असे. तसेच घरगुती विषय ती बाहेरच्यांशी शेअर करीत असल्यामुळे राकेशने हे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. यासोबतच राकेशने गुजरातमधील भडोच येथे नोकरी स्वीकारली होती. मात्र, तेथे येण्यास सोनाली तयार नसल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत असल्याचेही पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक किरण लोंढे करीत आहेत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौघांनी केली डॉ. पानसरेंची हत्या

News Desk

माहूरमध्ये ३ लाख ९८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक

News Desk

तीन महिन्याच्या बाळाच्या आणि पतीच्या गळयावर चाकू ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

News Desk