HW News Marathi
क्राइम

पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार

अहमदनगर – नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस कर्मचा-यावर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर असे आरोपीचे नाव असून तो नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

आरोपी अकोलकर सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अकोलकरने पीडित तरूणीची ओळख वाढवून गेल्या सहा महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला. आरोपी अकोलकर विवाहीत असून पीडित युवती नगरमध्ये शिक्षणासाठी आली होती.

या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेतील. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तिने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशन येथे मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आनंदराव अडसूळांकडे १ हजार कोटीपेक्षा जास्त अवैध संपत्ती! रवी राणांचा गंभीर आरोप

News Desk

शाळकरी मुलींच्या ऑटोला अपघात, नऊ वर्षीची बालिका दगावली

News Desk

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk

अखेर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

News Desk

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून टीका

News Desk