HW News Marathi
क्राइम

मातंग समाजाच्या मयत दफनविधीला गावक-यांचा विरोध, पोलीस बंदोबस्तात झाला दफनविधी

उत्तम बाबळे

नांदेड :- परडवाडी ता.नायगाव येथील मातंग समाजाच्या मयत गंगाधर रामजी वाघमारे यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास गावातील प्रस्थापित सवर्णांनी विरोध केल्यामुळे तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.परंतू प्रशासन,पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थितीने चोख बंदोबस्तात १० मे रोजी रात्री ७:०० वाजता दरम्यान अखेर त्याच वादग्रस्त स्मशानभूमीत स्व.वाघमारे यांचा दफनविधी करण्यात आला असून सद्या या गावात तणावपुर्ण शांतता आहे.

परडवाडी ता.नायगाव जि.नांदेड येथील रहिवासी असलेले मातंग समाजातील वयोवृद्ध गंगाधर रामजी वाघमारे (६५)यांचे दि.९ मे २०१७ रोजी दुपारी १:०० वाजताच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले.यामुळे त्यांचा अंत्यविधी दि.१० मे रोजी दुपारी १:०० वाजता गावातील दलित स्मशानभूमीत करण्याचे निश्चीत करण्यात आले व कुटूंबीय आणि नातेवाईकांनी त्या स्मशानभूमीत दफनविधीसाठी खड्डा खोदला.ही बाब गावातीलच प्रस्थापित तथा सवर्णजातीतल्या दशरथ पिराजी परडे यास समजली असता त्याने या दफनविधीस विरोध दर्शविला.कारण त्याने नियोजित दलित स्मशानभूमी असलेल्या जागेत मारोती कोंडीबा वजिरगे यांच्या जुन्या ७/१२ च्या आधारे गट क्र.१ मधील काही जागा ६ ते ७ वर्षापुर्वी खरेदी केल्याचे दाखवून त्याच स्मशानभूमीत टोलेजंग घर बांधले आहे.तसेच आता ही जागा स्मशानभूमीची नाही म्हणत त्याने काही महिन्यापुर्वीच स्मशानभूमीचा वाद दिवाणी न्यायालय बिलोली येथे न्यायप्रविष्ठ केला आहे.त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येई पर्यंत मी येथे कोणासही दफन विधी करु देणार नाही म्हणत ९ मे रोजी त्याने वाद घातला व गावातील त्याच्या श्रीमंत नातेवाईकानी प्रचंड विरोध केला.एवढेच नव्हे तर खोदलेल्या खड्याजवळ बसून रात्र काढली.गावात दुसरी स्मशानभूमी नसल्यामुळे स्व.गंगाधर वाघमारे यांचा दफनविधी अन्यत्र करणे शक्य नव्हते.यामुळे मातंग समाज व अन्य दलितांनी याच ठिकाणी दफनविधी करण्यात येईल अशी भूमीका घेतल्यामुळे एकाच धर्मातील दोन समाजात प्रचंड विरोध होऊन तणाव निर्माण झाला.यावेळी गावचे सरपंच वन्नाळे ,म.गांधी गाव तंटा मुक्ती अध्यक्ष हौसाजी कौठेवकर ,माजी चेरमन मारोती परडे ,नारायण पाटील कराळे ग्राम सेवक एस. आर. संगेवार तसेच लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे प्रा.रामचंद्र भरांडे,रावसाहेब पवार,सामाजिक कार्यकर्ते शेख खबरुद्दीन पाशामियाँ, शंकर गायकवाड, पंढरी भालेराव,प्रवीण भालेराव ,कैलाश भालेराव, राहुल जिगळेकर,रणजीत गोणारकर ,शंकर तमनबोईनवाड आदी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.परंतू दुसरी दलित स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने व पुर्वीची हक्काची असलेली आम्ही का सोडावी ? असा पावित्रा मातंग व दलित समाजाने घेतल्याने दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वेर बानापुरे,नायगावचे तहसीलदार काशिनाथ पाटील,गट विकास अधिकारी नारवटकर हे आपल्या ताफ्यासह तर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे (बिलोली),सहा. पो. नि. विवेकानंद पाटील,जमादार एस. एल.गोनारकर,पंतोजी,कोतापले,आदी जन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. नायगावपोलीस ठाण्याचे पो.उप.नि.एस. व्ही. रोडे,वागतकर ए. जी. पाटील ,रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पो.उप.नि.बनसोडे, पो.ना.डी. एस. वडजे आदींजनांसह कुंटूर,रामतीर्थ,बिलोली,नायगाव येथील पोलीसांह नांदेडहून दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले.परंतू दोन्ही ही बाजूने तोडगा निघत नसल्याने अखेर प्रशासन व पोलीसांनी त्याच स्मशानभूमीत स्व.गंगाधर वाघमारे यांचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला आणि भर उन्हात खड्डा खोदून घेतला.तसेच प्रशासन व पोलीसांच्या चोख बंदोबस्तात १० मे २०१७ रोजी स्व.गंगाधर वाघमारे यांच्यावर अंत्यविधी ( दफनविधी ) करण्यात आला.परडवाडीत सद्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना?”– देवेंद्र फडणवीस

News Desk

डीएसकेंना कोणत्याही क्षण अटक होणार

swarit

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

Aprna