HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर पंचायत समितीला सरपंच संघटनने ठोकले टाळे

 

भोकर पंचायत समितीचा निष्क्रीय कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन करु – सुनिल चव्हाण उत्तम बाबळे नांदेड :- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या भोकर पंचायत समितीच्या निष्क्रीय अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी यांच्या कारभाराल वैतागून तसेच लाभार्थी व ग्रामपंचायती अंतर्गतच्या विकासासात्मक कामांची होत असलेली अडवणूक थांबविण्यासाठी भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी आणि संघटनेच्या पदाधिका-यांनी ११ मे रोजी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराला टाळे ठोकले.या आंदोलनामुळे अधिकारी व राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण व भोकर मतदार संघाच्या विद्यमान आमदार अमिता अशोकराव चव्हाण या पती पत्नीच्या अर्थातच काँग्रेस पक्षाच्या अधिपत्त्याखाली गेली ५ वर्षे व आज ही भोकर पंचायत समिती आहे.जि.प., पं.स. २०१७च्या निवडणूका पार पडल्या व आरक्षीत जागेमुळे सभापती काँग्रेसचा झाला.तर बहुमत नसल्याने एका अपक्षाच्या सहाय्याने उपसभापती पद त्यास देऊन बहुमत सिद्ध केले.६ सदस्यांच्या सभागृहात ४ सदस्यांचे बहुमत करत काँग्रेसने सत्ता हस्तगत केली.परंतू या सदस्यांना अधिकारी व कर्मचा-यांवर वचक निर्माण करता आली नाही.त्याचे कारण म्हणजे या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.डी.गोरे हे मी खा.अशोक चव्हाण यांचा नातेवाईक आहे असे सांगत गेल्या ४ वर्षापासून येथे बस्तान मांडून सरपंच,ग्रा.पं.सदस्य,लाभार्थी,पं.सं.पदाधिकारी,कर्मचारी व नागरीक यांची दिशाभूल करुन आपल्या निष्क्रीयतेवर पांघरुन टाकत गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून विकासात्मक कामांना खीळ घातली आहे.८ मे २०१७ रोजी भोकर पंचायत समितीत खा.अशोक चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत व आ.अमिता अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पाणी टंचाई निवारण आढावा बैठकीत जे.डी.गोरे यांनी दिलेल्या अहवालात बनवाबनवी उघड झाली व खा.अशोक चव्हाण यांनी याबाबद तंबी दिली.ही झापाझापी तालुक्यातील अनेकांच्या उपस्थितीत झाल्याने जे.डी.गोरे यांचे खरे नाते संबंध उघडे पडले.आणि याच्या दुस-या दिवशीच ९ मे रोजी जे.डी.गोरे यांनी दीर्घ आजारी रजा टाकून पळ काढला.त्यांचा पदभार व्ही.आर.अरबडवार यांच्याकडे देण्यात आला.परंतू त्यांनी लाभार्थ्यांच्या व चालू असलेल्या विकासात्मक कामाच्या देयकांवर स्वाक्ष-या करण्याचे सातत्त्याने टाळले आहे.त्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थचे सर्व कामकाज खोळंबले आहे. पाणी टंचाई ने उग्ररूप धारण केले आहे. विहीरी,इंधन विहीरी अधिग्रहण करण्यास्तव स्वाक्षरी अभावी अनेक संचिका धुळखात पडून आहेत. शौचालयांचे बांधकाम पुर्ण होऊन देखील देयके थकली आहेत.तर रमाई घरकुल योजना, इंदिरा अवास योजना, पंतप्रधान घरकुल योजना, सिंचन विहीरसाठी, डि.आर.डी बचत गट, दलित वस्ती सुधार योजना,ठक्कर बाबा आदिवासी योजना, चौदाव्या वित आयोग, नरेगा या सर्व कामांच्या संचिका घेऊन पंचायत समितीला लाभार्थीं चकरा मारून पार वैतागले आहेत. त्यामुळे अनेक गावे विकास वंचित होत आहेत. खा.अशोक चव्हाण व आ.अमिता अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्त्याखाली ही पंचायत समिती आहे हे खे असले तरी त्यांचा पंचायत समिती पदाधिका-यांवर व पदाधिका-यांचा अधिका-यांवर आणि अधिका-यांचा कर्मचा-यांवर कसलाच दबदबा नसल्याने सर्व काही अलबेल कार्यभार झालेला आहे.या सर्व बाबी लक्षात घेता लाभार्थींची हेळसांड थांबावी व सर्व विकासात्मक कामे लवकरात लवकर व्हावीत या मागणीस्तव भोकर तालुका सरपंच संघटनेने ११ मे रोजी एक अनोखे आंदोलन केले.सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान संघटनेचे अध्यक्ष सुनिल चव्हाण,माजी अध्यक्ष गणेश कापसे पाटील,किशोर पाटील लगळूदकर,उपाध्यक्ष साहेबराव जाधव, सचिव मुक्ताबाई गायकवाड, लक्ष्मण पापुलवाड, सौ.सुवर्ण गणेश देवकर यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, लाभार्थी यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.यामुळे अधिकारी व कर्मचा-यांना २ ते ३ तास कार्यालयात जाता आले नाही.याची दखल घेऊन पंचायत समितीचे उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड व सभापतींचे पती गुलाब चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन पंचायत समितीचा ढेपाळलेला कार्यभार आम्ही लवकरच सुधारण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन माघे घेण्यात आले.परंतू ८ दिवसाच्या आत हे नाही झाले तर पुढे याही पेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी दिला असून याची दखल घेत जि.प.मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या आदेशाने जि.प.चे पशू संवर्धन अधिकारी पवार यांनी पंचायत समिती व आंदोलन कर्त्यांची दुपारी भेट घेऊन लवकरच आम्ही हा कार्यभार सुधारु असे सांगीतले आहे.परंतू खा.अशोक चव्हाण व आ.अमिता चव्हाण यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पंचायत समितीचा अलबेल कार्यभार व्यवस्थित करण्यासाठी ते काय भुमिका घेतील ? याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

News Desk

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, खातेवाटपावर चर्चा

News Desk

उरणच्या खोपटा पुलावर दहशतवादी संघटनेच्या मजकूराने खळबळ

News Desk