HW News Marathi
क्राइम

लोहा -महा वितरण शाखेचा अजब कारभार

विद्युत जोडणी न करता पांगरा तांडा येथील ग्राहकांना दिले दोन महिन्याची बिले उत्तम बाबळे नांदेड :- महा विद्युत वितरण कंपनी शाखा लोहा अंतर्गत उप शाखा कलंबर क्षेत्रातील पांगरा ताडा येथील विद्युत ग्राहकांची रितसर जोडणी नकरता बिले मात्र दिली दोन महिन्यांची.या अजब कारभारामुळे ग्राहकांनी तक्रार केली असता तारेवर आकोडे टाकून थातुर मातूर मिटर जोडणी करुन एका अभियंत्याने वेळकाढूपणा केला असून संबंधित अभियंत्या विरुद्ध काय कार्यवाही होणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महा विद्युत वितरण कंपनी शाखा लोहा जि.नांदेड अंतर्गत च्या उप शाखा कलंबर क्षेत्रातील पांगरा तांडा येथील नागरीकांनी तांड्यातील विद्युत मिटर जोडणीसाठी खांबे उभारणीस्तव १ लाख ४० हजार रुपये महा विद्युत वितरण शाखेत भरले.तसेच घरांत विद्युत मिटर जोडणी करावी म्हणून रितसर कोटेशन्स भरली.कंपनीने विद्युत खांबे उभारली नाहीत व मिटर कोटेशन भरलेल्या ग्राहकांना खांबावरुन सुरक्षीतरीत्या तार जोडणी न करता आकोडे टाकून जुन्या तारेनेच असुर्कीत तथा अवैद्य रित्या विद्युत प्रवाह पुरवठा करुन दिला.मिटर दिले नसतांनाही दोन महिन्याचे बिले मात्र देण्यात आली.ही बाब ग्राहकांना खटकल्याने त्यांनी संपादक माधव भालेराव,कंधार यांचे सहकार्य घेतले.यावरुन माधव भालेराव यांनी कलंबर उप शाखेचे अभियंता बोधनकर यांच्या विरुद्ध ४ मे २०१७ रोजी लोहा शाखा व वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबद तक्रार केली.

https://youtu.be/nmTUneOoWR4

या तक्रारीनंतर अभियंता बोधनकर यांनी विद्युत खांबावरुन सुरक्षीत तार जोडणी न करताच आकोडे टाकलेल्या कमकुवत व जुन्या तारेला मिटर जोडून त्या ग्राहकांना असुरक्षीत विद्युत पुरवठा केला.कांही दिवसात पावसाळा सुर होणार असून पाऊस व वादळाने हा असुरक्षीत विद्युत पुरवठा केंव्हाही खंडीत होऊ शकतो आणि मोठी दुर्घटना देखील होऊ शकते.म्हणून पांगरा तांडा येथील विद्युत ग्राहकांनी रक्कम भरलेले खांब त्वरीत उभारावेत व सुरक्षीत विद्युत मिटर जोडणी करुन द्यावी आणि विद्युत पुरवठा न करताच दिलेली दोन महिन्याची बिले रद्द करुन संबंधित अभियंत्या विरुद्ध त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी लोहा शाखा अभियंता व वरीष्ठ कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे पुनश्च एकदा केली असून वरीष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे,तर कार्यवाही त्वरीत न झाल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा पांगरा तांडा येथील विद्युत ग्राहकांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव जिल्हाधिका-याला आयएसआयएसकडून धमकीचे पत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रपती भवन उडवून देण्याची धमकी

News Desk

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED कडून अटक

Aprna

अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk