HW News Marathi
क्राइम

वाशिम जिल्ह्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

विनोद तायडे

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोराळा जहागीर येथील ग्रामसेवकाने सहस्त्र विहिरीच्या तांत्रिक मान्यतासह वर्क ऑर्डरसाठी 2000 हजार रुपये लाचेची मागणी केल्यावरून एसीबी ने ग्रामसेवक भगवान सखाराम भिसडे यांना 25 मार्चला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोराळा येथील एका शेतकऱ्याच्या पत्नीने 20 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भगवान सखाराम भिसडे वय 56 वर्ष ग्रामसेवक बोराळा जहागीर ता मालेगाव जिल्हा वाशिम यांनी पतीला सहस्त्र मंजूर विहिरींच्या तांत्रिक मान्यतेसह वर्क ऑर्डर काढण्यासाठी 18 मार्च ला भ्रमण ध्वनीद्वारे 2000 रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाच लुचपात प्रतिबंधक विभागाकडे केली 24 मार्चला अधिकाऱयांनी पंचासमक्ष बोराळा येथे जाऊन पडताळणी केली असता त्यावेळी 25 मार्चला बोराळा येथील गजानन जटाळे यांच्या घरी 2000 रुपये लाच देण्याचे ठरले 25 मार्चला भगवान भिसडे यांना लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आलोसे विरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये कलम7,12,13, (1)सह कलम 13(1) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये कार्यवाही करण्यात आली

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश चिमटे,अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक नाशिकर, पोलीस उपअधिक्षक व्ही गांगुर्डे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक ए जी रुईकर,पोलीस जमादार भगवान गावंडे,विनोद सुर्वे सुनील पुंडे आदींनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिम येथील दरोडेखोर अटक

News Desk

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

swarit

पाटोद्यात जुगार खेळणाऱ्या २२ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त      

News Desk