HW News Marathi
मनोरंजन

भारतातील नाताळ आणि खाद्यसंस्कृती

नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात. भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो.

नाताळ आणि खाद्यसंस्कृती

नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सव २०१८ | लालबागच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

News Desk

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ‘हाय ग्रेड कॅन्सर’

News Desk