HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : राज्यातील ३०० चित्रपटगृहात युवकांसाठी ‘उरी’चे फ्री शोज  

मुंबई | देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, महाराष्ट्र राज्यात यावर्षी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कारगिल विजयदिनी २६ जुलैला सकाळी १० वाजता राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये १८ ते २५ वयोगटातील युवकांसाठी चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. ‘उरी… द सर्जिकल स्ट्राईक’ हा यद्धपट राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहात एकाच दिवशी आणि एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ९० हजार महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना या युद्धपटाचा आनंद घेता येणार आहे. हा युद्धपट मोफत दाखवण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.
राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना आणि अभिमान वृद्धींगत व्हावा, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे कथानक असलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील ‘हाउज द जोश’ ही घोषणा तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती. अभिनेता विकी कौशल या चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला. दिग्दर्शक आदित्य धरचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट एवढी कमाई करेल असा त्याला स्वतःलाही अंदाज नव्हता. आदित्य धर याने उरीच्या कारवाईचा दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभर प्रदर्शित झाला होता. युवकांनी ‘हाउज द जोश’ या प्रश्नाला ‘हाय सर’ म्हणत दाद दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच स्वीकारणार, कलाकारांनी केला इराणींना विरोध

swarit

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

News Desk

किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

News Desk