HW News Marathi
मनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच स्वीकारणार, कलाकारांनी केला इराणींना विरोध

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात गुरुवारी 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार वितरणावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु , व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या पुरस्कार सोहळ्याला पुर्ण वेळ उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे या पुरस्कारांमध्ये केवळ अकराच पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती पुर्ण वेळ उपस्थित राहू शकणार नसल्यामुळे उर्वरीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. परंतु राष्ट्रपती प्रदान करणार असलेले हे अकरा पुरस्कार नेमके कोणते हे अद्याप स्पष्ट नसले तरी आधी तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा या पुरस्कारांचा क्रम असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले नाही तर या पुरस्कारसोहळ्यावर बहिष्कार टाकू असा पवित्रा पुरस्कार पुरस्कार विजेत्यांनी घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… दिवाळीच्या फराळमधील ‘अनारसे’ सोप्या पद्धतीने कसे कराल  

swarit

सरकारवर टीका केल्यामुळे अमोल पालेकरांचे भाषण रोखले

News Desk

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar