नवी दिल्ली । कारगिल विजय दिवसाची आज २० वी वर्षपूर्ती झाली आहे. या निमित्ताने आज (२६ जुलै) देशभर कारगिल विजय दिवस साजरी केला जातो. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती २५ ते २७ जुलै अशी तीन दिवस साजरी होणार आहे. भारतीय सैन्याच्या धैर्य आणि शौर्याला सलाम करत आहे.
Delhi: Defence Minister Rajnath Singh pays tribute at National War Memorial on 20th #KargilVijayDiwas. pic.twitter.com/PWssdObUJY
— ANI (@ANI) July 26, 2019
कारगिल विजय दिनानिमित्ताने द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहली. याशिवाय राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून म्हटले की, “कारगिल विजय दिवस २० वी वर्षपूर्तीवर भारतीय सैन्याच्या धैर्य आणि शौर्याला सलाम करत आहे. कठिण परिस्थितीत देशाच्या सन्मानाची रक्षा करणाऱ्या सर्व शहीत जवानांना देशातील जनता श्रद्धांजली अर्पण करत आहे.” असे म्हणाले आहेत
कारगिल विजय दिवस की २०वीं वर्षगाँठ पर मैं भारतीय सेना के शौर्य एवं बलिदान को नमन करता हूँ।सारा देश उन सभी शहीद सैनिकों को श्रद्धांजलि अर्पित करता है जिन्होंने विपरीत परिस्थितियों के बावजूद बहादुरी से लड़ते हुए भारत के सम्मान की रक्षा की। उनका अदम्य साहस एवं बलिदान प्रेरणास्पद है।
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2019
या कार्यक्रमाचा समारोप २७ जुलैला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. २० वर्षापूर्वी कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ८ मे ते २६ जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते, तर १३६३ जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.