Site icon HW News Marathi

प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंक नाजूक; चाहत्यांच्या चिंतेत वाढ

मुंबई | प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाने दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ही आधीपेक्षा जास्त खराब झाली असून  ब्रेन डेड झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे. तसेच राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे टोके अनियमित झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती संदर्भात माहिती मिळाल्यानंतर चाहात्यांची चिंता वाढली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने पुन्हा काम करावे, यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, डॉक्टरांना अपेक्षित असे यश मिळत नाही.

वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर एम्स रुग्णालयात करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव हे रुग्णालयात दाखल झाल्यापासून बेशुद्ध असून अद्याप ते शुद्धीवर आले नाही. राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली होती. परंतु, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून राजू श्रीवास्तव यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या कार्यक्रमातून राजू श्रीवास्तव यांनी ‘गजोधर भैया’चे पात्रने त्यांनी यूपीचा वेगळा अंदाज दाखवला. यामुळे राजू श्रीवास्तव यांनी चहात्यांच्या मनात अधिराज्य गाजवीले.

 

 

Exit mobile version