HW News Marathi
मनोरंजन

मकरसंक्रांत स्पेशल तिळाच्या करंज्या

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरु होते, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात होते. या बदलाला अतिशय शुभ मानले जाते. भारताच्या विविध भागात संक्रांती या सणाची विविध नावे आहेत. महाराष्ट्रात मकरसंक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडुतील थाई पोंगल तर आसाम मधील भोगली बिहू. हिच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त अशाच काही विविध पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

मैदा

तीळ

गूळ

खोबऱ्याचा कीस

जायपत्री

वेलची

तेल किंवा तूप तळणासाठी

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि पाणी एकत्र घेऊन मैद्याचा गोळा भिजवून घ्या. २ वाटी तीळ भाजून घ्या थंड करुन मिक्सरमध्ये बारीक करुन एका भांड्यात काढा. त्यामध्ये १ वाटी गूळ, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १ चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर टाकून सर्व साहित्य एकत्र करुन घ्या सारण तयार करुण घ्या. वरिल मैद्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पाती लाटून घ्या त्यामध्ये तयार सारण भरुण करंजीचा आकार द्या. ८ ते १० करंज्या तयार झाल्या की तेल किंवा तूप गरम करायला ठेवा. ते चांगले तापले की त्यात सर्व करंज्या तळून घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk

दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी करा ‘नाशिक चिवडा’

swarit

केतकी माटेगावकर, रोहित राऊत आणि वैशाली माडे यांचे “अहिल्या”साठी पार्श्वगायन

News Desk