HW News Marathi
मनोरंजन

दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी करा ‘नाशिक चिवडा’

दिवाळीच्या फराळातील अनेक पदार्थांपैकी ‘चिवडा’ हा अनेकांच्या अत्यंत आवडीचा असतो. आपल्याकडे नाशिकचा चिवडा हा सुप्रसिद्ध आहे. हा नाशिकचा चिवडा जर घरच्या घरी करता आला तर ? मग यंदाच्या दिवाळीच्या फराळासाठी प्रसिद्ध असा ‘नाशिक चिवडा’ घरच्या घरी कसा करायचा हे जाणून घ्या.

साहित्य :-

१/२ भाजके पोहे

पाऊण किलो तेल

साखर

सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी

१ १/२ वाटी शेंगदाणे

१ १/२ वाटी डाळे

१/२कांदे

तिखट

मीठ

तीन-चार आमसुले

मसाला तयार करण्याची सामग्री :-

लवंग,

दालाचिनी,

जिरे,

शहाजिरे,

धने,

तमालपत्र,

दगडफूल,

मिरे,

बडीशेप,

तीळ

हिंग हे सर्व पदार्

कृती :-
  • प्रथम कांदा उभा चिरून, उन्हात वाळवून घ्यावा.
  • मसाल्याचे साहित्य प्रत्येकी समप्रमाण घेऊन, ते सर्व जिन्नस तेलावर वेगवेगळे भाजून त्याचा मसाला तयार करून घ्यावा.
  • खोबऱ्याचे काप करून घ्यावेत.
  • पोहे निवडून घ्यावेत.
  • तेल घेऊन त्या तेलात कांद्याचे काप, खोबऱ्याचे काप, आमसुले व शेंगदाणे वेगवेगळे तळून घ्यावेत
  • नंतर तेल खाली उतरवून, त्या तेलात चवीप्रमाणे मीठ व तिखट, हळद, तळलेली आमसुले बारीक चुरून घालावीत.
  • तयार केलेला मसाला, दाणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे काप व डाळे हे सर्व घालून चांगले कालवावे.
  • पोहे आणि चवीनुसार साखर घालून परत चांगले एकत्र कालवावे.
  • चिवडा तयार.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चलो जीते है” मोदींवर आधारित लघुपट शाळांमध्ये दाखवा!

swarit

FlashBack 2018 : २०१८ मध्ये हे कलाकर वादाच्या भौ-यात अडकले

News Desk

गुलमोहर फुलला

swarit