HW News Marathi
मनोरंजन

यंदा तीळ-गुळावर महागाईची संक्रात

मुंबई |तीळ गूळ घ्या… गोड गोड बोला” असे आपण वर्षानुवर्षे बोलत आलो आहोत. पण गोड गोड बोलण्यासाठी वर्षानुवर्षे दिले जाणारे तीळगुळ यंदा मात्र संक्रात आली आहे. महागाईचा परिणाम आता तीळ आणि गुळावर झालेला दिसून येत आहे. या दोघांच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून महागाईत वाढ होत आहे.

कांद्यापाठोपाठ भाज्या, तेल आणि किराणा सामानाच्या किंमतीहीवर जाणारा आलेख दाखवत आहेत. बाजारात किरकोळ विक्रीसाठी पॉलिश तिळाचा भाव २३०-२४० रुपये तर चांगल्या तिळाचा भाव २००-२४० रुपये आहे. लाडवासाठी वापरण्यात येणारा चिकीच्या गुळाची किंमत ५० ते ६० रुपयांदरम्यान आहे.

मधल्या काळात शेंगदाणा तसेच डाळ्याच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे घराचे महिन्याचे बजेट सांभाळण्यासाठी गृहिणींनी लाडवाच्या सामानात कपात केली आहे. तसेच यंदाच्या वर्षी महागाईमुळे मालाची मागणी कमी झाली आहे, असे दादर येथील विक्रेते गजानन भोंगळे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहरूखची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक

News Desk

#MeToo संस्कारी बाबूजींवर बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

मकरसंक्रांतीशी स्त्रिया-नवजात बालकांचे विशेष नाते

News Desk