HW News Marathi
मनोरंजन

पारंपरिक तिळाच्या वड्या

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरु होते, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात होते. या बदलाला अतिशय शुभ मानले जाते. भारताच्या विविध भागात संक्रांती या सणाची विविध नावे आहेत. महाराष्ट्रात मकरसंक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडुतील थाई पोंगल तर आसाम मधील भोगली बिहू. हिच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त अशाच काही विविध पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

पांढरे तीळ

गूळ

पाणी

कृती

एका भांड्यात दोन ते तीन लहान चमचे पाणी घ्या त्यात गूळ टाकून त्याचा पाक तयार करुन घ्या. हा गोळीबंद पाक तयार करुन घ्या. नंतर त्या पाकामध्ये तीळ टाकून व्यवस्थित मीसळून त्याचा एक गोळा तयार करुन घ्या, पोळपाटाला थोड तूप लावून त्यावर हा गोळा गरम असतांनाच त्याची पातळ पोळी लाटून घ्या आणि थंड करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : पाकिस्तानचा पराभव आणि भारताच्या विजयाची 10 कारणे

News Desk

अभिनेता अरमानला अवैध दारुसाठा प्रकरणी अटक

News Desk

नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…

News Desk