HW News Marathi
मनोरंजन

FlashBack2018 : मुंबईकरांसाठी ‘या’ घटना ठरल्या धक्कादायक

२०१८ च्या सुरुवातीपासूनच अनेक घटना मुंबईकरांसाठी धक्कादायक ठरल्या सुरुवातीपासून अगदी डिसेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबईकरांसाठी धक्कादायक ठरलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा.

पवईत क्रेन कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

२०१८ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत अपघात झाला. नव्या वर्षात तरी अपघाताची मालिका संपेल असे वाटणा-या मुंबईकरांचा यावेळी स्पष्ट भ्रम निरास झाला. नववर्षाचे स्वागत होत असतानाच पवई येथे क्रेनचा लोखंडी रहाट तुटून झालेल्या विचित्र अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

भारत पेट्रोलिअमच्या कंपनीत स्फोट

मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या भारत पेट्रोलिअमच्या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती. बुधवारी ८ ऑगस्ट २०१८ रोजी लागलेल्या या आगीत कंपनीचे ४५ कामगार जखमी झाले होते. सुदैवाने सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

घाटकोपरमध्ये चार्टड विमान दुर्घटना

घाटकोपर परिसरात गजबजलेल्या ठिकाणी विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक प्रदीप राजपूत, सहवैमानिक भाटिया, इंजिनीअर सुरभी, तंत्रज्ञ मनोज पांडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एका पादचा-यालाही प्राण गमवावे लागले होते. मानवी वस्तीमध्ये कोळलेल्या या विमानामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अंधेरी पूल दुर्घटना

गतवर्षीच्या एल्फिन्स्टन रोड स्थानक पूल दुर्घनेनंतर यंदा झालेली अंधेरी पूल दुर्घटना मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली. अंधेरी रेल्वे स्थानकानजीक असलेला पादचारी पूल कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली होती. या दुर्घटनेमुळे तब्बल १३ तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होता.

गणेश विसर्जनादरम्यान बोट बुडाल्याने अपघात

गणेश विसर्जनादरम्यान अपघातात ६ ते ८ जण पाण्यात बुडाले होते. यावेळी पाण्यात बुडलेल्या लोकांपैकी ५ वर्षीय साईश मर्दे या लहान मुलाचा शोध लागला नव्हता. त्यानंतर सलग सहा दिवशी नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकाॅप्टरच्या मदतीने साईशचा शोध घेत होते. अखेर राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळला होता.

शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटना

बहुचर्चित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असलेल्या एका स्पीडबोटला अपघात झाला होता. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही बोट जात होती. या दुर्घटनेत बोटीतील सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता.

परेलच्या क्रिस्टल प्लाझा इमारतीला आग

परळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या तळमजला अधिक सतरा या क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्याला आग लागली होती. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.

अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला भीषण आग

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १४६ जण जखमी झाले होते.

चेंबूर सरगम सोसायटी आग दुर्घटना

चेंबूर मधील सरगम ​​सोसायटीला आग लागल्याची घटना घडली होता. चेंबूरच्या टिळकनगर येथील गणेश गार्डनजवळ असलेल्या या इमारतीत लागलेल्या आगीत बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाला अडथळा आल्यामुळे आग विझविण्यासाठी विलंब लागला होता.

साधना इंडस्ट्रीअल इस्टेटला आग

वरळीतील बीडीडी चाळीजवळील साधना इंडस्ट्रीअल इस्टेट या तीन मजली इमारतीला २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आग लागली होती. यामध्ये अग्निशमन दलाचे ११ जवान जखमी झाले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक ‘या’ दिवशी होणार रिलीज

News Desk

NewYear2019 : नवीन वर्षानिमित्त अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्छा

News Desk

#IndependenceDay | मी पंतप्रधान नव्हे तर, प्रधानसेवक !

News Desk