HW News Marathi
राजकारण

नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज

मुंबई | २०१८ हे वर्ष संपायला अवघे १०-१२ दिवस उरले असून, नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तरुणाईची लगबग सुरू झाली आहे. कॉलेजच्या कट्ट्यावर थर्टीफर्स्टच्या गप्पा रंगत असून, नवीन वर्षात काय संकल्प करणार याबाबत चर्चा ऐकायला मिळत आहे. ३१ डिसेंबरला यंदा सोमवार येत आल्याने थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी अनेकांनी नवनवीन बेत आखले आहे. युवा वर्गाकडून पर्यटनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे.

नोकरदार मंडळींनी कुटुंबीयांसह पर्यटनस्थळी हॉटेल्स बुक केली आहेत. स्थानिक पातळीवरही ग्राहकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देत नववर्षासाठी रुचकर पदार्थांचे नियोजन हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच केल्याचे दिसत आहे. सोबतीला नृत्य-संगीताच्या कार्यक्रमांमुळे थर्टीफर्स्टची रंगत अधिक वाढणार आहे. सार्वजनिक मंडळे तसेच विविध संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने शुभेच्छा फलक तयार करण्यात आले असून, त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच प्रकारे शहरातील बाजारपेठेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वस्तू दाखल झाल्या असून, वस्तू खरेदीसाठी तरुणाई उत्सुक आहे. दादर, कुर्ला, माटुंगासहित विविध भागात नवनवीन वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या असून, शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध संस्था व संघटनांतर्फे तयारी सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चोराच्या उलट्या बोंबा

swarit

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

News Desk