मुंबई | नववर्षाच्या निमित्ताने मुंबई, मुंबई, नवी मुंबई आदी शहरांच्या अनिवासी भागातील, मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल २४ तास सुरू ठेवण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून हे पत्र त्यांनी ट्विट देखील केले आहे.
My letter to @CMOMaharashtra about 31st December and Mumbai 24×7 proposal pending for a few months. pic.twitter.com/uWqGVKWW5q
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 26, 2018
आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पुणे, मुंबई, नवी मुंबई आदी शहरांच्या अनिवासी भागातील, मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होईल, शिवाय रोजगारही उपलब्ध मिळणार आहेत. दिवसभरात कायदेशीर असलेले हॉटेल, मॉल रात्री बेकायदेशीर कशी ठरू शकतात, असा सवाल या पत्रातून आदित्य यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे म्हणाले की, मॉल, मिल कंपाउंडमधील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवल्यामुळे लोकांना नव्यावर्षाचा मनसोक्त आनंद घेता येईल.’
Shiv Sena Yuvasena Chief Aditya Thackeray (pic 1) writes to Maharashtra CM (pic 2) requesting him to clear the proposal of allowing the markets in non-residential areas to remain open 24 hours in Mumbai, Pune, Thane, Navi Mumbai for New Year's celebrations. (File pics) pic.twitter.com/II0ZSfBRYu
— ANI (@ANI) December 27, 2018
ठाकरे यांनी पालिकेत २०१३ मध्ये मुंबईतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवावीत, असा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावाला २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी मान्यता दिली असून सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे मंजुरीसाठी असल्याकडे आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.